वाशिम:- दोषसिध्दीचे प्रमाण वाढविणे करीता शासना कडून परिपत्रके/मार्गदर्शक सुचना प्राप्त होतात. त्या अनुषंगाने
वाशिम जिल्हा मा. पोलीस अधिक्षक, श्री. बच्चन सिंह यांचे मार्गदर्शना नुसार अपर पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना वारंवार सुचना, मार्गदर्शन करुन शासन परिपत्रकांचे कटाक्षाने अनुपालन होणे करीता जिल्ह्याचे ठिकाणी स्थापीत TMC सेल वाशिमचे मार्फतीने सर्वोतोपरी पर्यत्न सुरु ठेवले आहेत. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या वतीने न्यायप्रविष्ठ करण्यात आलेल्या प्रत्येक गंभीर व किरकोळ प्रकणाचा जातीने पाठपुरावा करण्यात येत आहे.
याचाच प्रत्यय ग्राम आसोला जहाँगिर येथील खूनाच्या गुन्ह्यातील २ आरोपीतांना मा. जिल्हा व सत्र न्यायालय,वाशिम येथे आज लागलेल्या जन्मठेपेचे शिक्षे वरुन दिसून आला आहे.ग्राम आसोला जहाँगिर ता. जि. वाशिम येथे दि. २६.०२.२०१९ रोजी घडलेल्या घटनेची फिर्यादी गं.भा. उषा बंडु खडसे, वय-३१ वर्षे यांनी रिपोर्ट दिला की, आरोपी क्र. ०१ गणाजी विश्वनाथ खडसे, वय – ३८ वर्ष व आरोपी क्र. ०२ विश्वनाथ यादव खडसे, वय – ६७ वर्ष दोघे रा. आसोला जहाँगिर यांनी घराचे समाईक भिंतीचे वादावरुन व जुन्या भानगडीचे कारणावरुन फिर्यादी उषा हिचा नवरा मृतक नामे – बंडु सोपान खडसे वय – ३५ वर्षे याला कुऱ्हाडीने व काठीने डोक्यावर वार करुन जिवाने मारुन टाकले. असा रिपोर्ट दिल्याने पो.स्टे. वाशिम ग्रामीण येथे अपराध क्र.४९/१९ कलम-३०२, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला. वरुन पो.स्टे. वाशिम ग्रामीणचे वतीने सखोल तपास करुन खटला न्यायप्रविष्ठ करण्यात आला होता.दि.२९.०९.२०२२ रोजी नमुद खटला क्र. ST.६५ / १९ चा विदयमान जिल्हा व सत्र न्यायालय वाशिम यांनी
न्यायनिवाडा करतांना आरोपी नामे- क्र. ०१ गणाजी विश्वनाथ खडसे, वय – ३८ वर्ष व आरोपी क्र. ०२ विश्वनाथ यादव खडसे, वय-६७ वर्ष दोघे रा. आसोला जहाँगिर यांना कलम ३०२, ३४ भादंवि प्रमाणे दोषी ठरवून दोघांनाही जन्मठेप व प्रत्येकी २००० /- रुपये नगदी दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर गुन्ह्यात सरकारचे वतीने सर.अभियोक्ता म्हणून अॅड. श्री. अभिजित व्यवहारे यांनी काम पाहीले असून नमुद गुन्हयातील पिडीत फिर्यादी हिला न्याय मिळवून देण्यात मदत केली आहे.तसेचपो.उप.नि.श्री.अशोक जायभाये, पो.स्टे. वाशिम ग्रा. यांनी सदर गुन्ह्याचा सखोल तपास करुन प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते. त्यानंतर सदरचे खटल्यात कोर्ट पैरवी म्हणून पो.हे. कॉ. बाबुराव नाईक पो.स्टे. वाशिम ग्रा.
तसेच TMC सेलच्या सहा. पोनि. मनिषा तायडे व त्यांचे सहकारी पोहेकॉ. संतोष निखाडे, पोहेकॉ. विष्णु मोटे, पोकॉ.दिपक गिरी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206