मंगरुळपीर येथील काॅग्रेस कमेटीच्या वतीने प्रशासनाला लेखी निवेदन सादर
वाशिम:-मंञालय प्रवेश व्दारासमोरील संत गाडगेबाबांची दशसुञी हटविल्याच्या विरोधात काॅग्रेस कमिटी, ओ. बी. सी. सेल, एन. एस. यू. आय. अल्पसंख्यांक सेल, महिला काँग्रेस कमिटी, अनु. जाती जमाती सेल गंगरूळपीर, जि.वाशिम च्या वतीने मंगरुळपीर येथील तहसिलदारामार्फत लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.
मुंबई मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर संत गाडगे बाबांची संगमवर दगडी फलक दशसुत्री महाविकास आघाडी सरकारने लावली असता नुकत्याच महाराष्ट्रराज्याच्या सत्तेवर आलेल्या ई. डी. युती सरकारने राज्यामध्ये संत गाडगेबा यांनी ग्राम स्वच्छता अभियान,भुकलेल्याना अन्न, तहानलेल्याना पाणी, नागड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना निवारा देण्याचे कार्य केले असता असे महापुरुष संत गाडगेबाबा यांचे मंत्रालयातील प्रवेशद्वारावरील संगमवरी दगडावरील दशसुत्री फलक लावले असता फडणवीस शिंदे युती सरकारने संत गाडगेबाबांची दशसुत्री फलक त्या ठिकाणावरून काढण्यात आली त्यामुळे संत गाडगेबाबांचा हा घोर अपमानच या राज्य सरकारने केला असल्यामुळे यांचा निषेध म्हणून जे संगगवर फलक दशसुत्री हटवली ती त्याच मंत्रालयातील प्रवेशद्वारावर लावण्यात यावी, अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही असे लेखी निवेदन येथील तहसिलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवले आहे. महाराष्ट्र राज्य यांनी त्वरित निर्णय घ्यावा असेही सदर निवेदनात नमुद आहे.या निवेदनावर काॅग्रेस कमेटीचे प्रदेश प्रतिनीधी अॅड.प्रकाश इंगोले,मा.सभापती रमेश इंगोले,जावेद सौदागर,शेखर शिंदे,वसंतराव बडवे,विजय सोनोने,राजेश पवार,सुनिल मिसाळ,गोपाल सावके,ऊबेद मिर्झा,सलिम जहागिरदार यांचेसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206