आरोपीसह १६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त
वाशिम:-दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंची काळाबाजारी, साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. त्यामुळे महागाई वाढून त्याचा जनसामान्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो. अश्याप्रकारचा जीवनावश्यक वस्तूंचा गैरप्रकार तसेच काळाबाजार रोखण्यासाठी साठेबाजी/काळाबाजारी करणाऱ्यांविरोधात मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ नुसार कारवाया करण्यात येत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर दि.२८.०९.२०२२ रोजी पो.स्टे.कारंजा ग्रामीण हद्दीतील ग्राम कोळी येथे एक इसम जीवनावश्यक धान्य – तांदुळाचा साठा करून काळाबाजारी करत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शन व आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे पंचासमक्ष छापा टाकला असता ग्राम कोळी येथील इसम नामे अमीर मदार गुगीवाले, वय ३२ वर्षे याने त्याच्या ताब्यात अवैध विनापरवाना शासकीय स्वस्त धान्य दुकानात वितरीत करण्यात येत असलेला तांदळाचा साठा ७० किलो वजनाचे एकूण ७९ कट्टे ज्याची किंमत अंदाजे ९५,२२०/- रुपये असे चार वाहनांमध्ये भरून ठेवल्याचे आढळून आले. त्यास धान्याचा परवाना व वाहनांच्या कागदपत्रांची मागणी केली असता तो कोणत्याही प्रकारचा परवाना व कागदपत्रे सादर करण्यास असमर्थ ठरल्याने पंचासमक्ष ७० किलो वजनाचे एकूण ७९ कट्टे ज्याची किंमत अंदाजे ९५,२२०/- रुपये व चार वाहने अंदाजे किंमत १५,६४,०००/- रुपये असा एकूण १६,५९,२२०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक सपोनि.विजय जाधव, पोहवा.गजानन अवगळे, नापोका.मुकेश भगत, राम नागुलकर, गजानन गोटे, संगीता शिंदे, किशोर खंदारे, शुभम चौधरी व चालक पोकॉ.घोडे यांनी पार पाडली. जीवनावश्यक वस्तूंचा गैरप्रकार करत साठेबाजी व काळाबाजार करून नागरिकांच्या सोयीसुविधांमध्ये बाधा निर्माण करू पाहणाऱ्या साठेबाजांवर वाशिम पोलीस दल लक्ष ठेवून आहे. नागरिकांनीही त्यांना आढळलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या गैरप्रकाराबाबत वाशिम जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षास (संपर्क क्र. ०७२५२-२३४८२४) किंवा संबंधित पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206