पुणे : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा निमित्ताने सहायक आयुक्त समाजकल्याण आणि कर्वे समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टँड अप इंडिया-मार्जिन मनी’ योजनेविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापिका अश्विनी कोकाटे, कर्वे समाजसेवा संस्थेच्या संचालिका डॉ. शमिला रामटेके, सहयोगी प्राध्यापक डॉ. महेश ठाकूर आदी उपस्थित होते.श्रीमती डावखर यांनी स्टँड अप इंडिया मार्जिन मनी योजनेबाबत मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोहचवावी. विद्यार्थी व नवउद्योजकांनी नवनवीन उदयोग सुरू करून या योजनेचा लाभ घ्यावा. योजनेबाबत आवश्यक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले. श्रीमती कोकाटे यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या बीज सांडवल योजनासह विविध योजनांची माहिती दिली.
एनटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे पुणे