पुणे : घोंगडी महाराष्ट्राचे पारंपारिक ओळख आहे. ग्रामीण भागात घोंगडीचें नागरिकांशी कौटुंबिक नातं निर्माण झालेलं आहे. या नात्याला कित्येक पिढ्यांची पार्श्वभूमी आहे. इंदापूर तालुक्यात अगदी पारंपरिक पद्धतीने घोंगडी विणणारे कुशल कारागिर आहेत. 

    साधारणपणे एक घोंगडी विणायला दोन ते तीन दिवस लागतात. पूर्वी १२ फूट लांबीची घोंगडी विणली जात असे, पण आता मात्र आपल्या मागणीनुसार हवी अशी बनवून दिली जाते. सर्वसाधारणपणे एक घोंगडी विणायला ३ ते ४ किलो लोकर लागते.. मेंढ्यांच्याच लोकरीपासून घोंगडी का बनवली जाते असे प्रश्न बर्‍याचदा आपल्या पडत असतील तर तर त्याचे उत्तर म्हणजे मानवी जीवनात घोंगडी हि एक औषधी आहे!धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे-पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो. यामध्ये जेण (घोंगडीचाच एक जाड प्रकार) वापरणे जास्त योग्य ठरते.झोप येत नसणार्‍यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो.हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा देते.घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत.अर्धांगवायूचा धोका टळतो..आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.धार्मिकदृष्ट्या पूर्वीपासून घोंगडी चे महत्व: पूर्वी ध्यानधारणा करण्यासाठी , धार्मिक अनुष्ठान करण्या साठी घोंगडी वापराला अनन्य साधारण महत्व होत.यापैकीच एक असणारे जगन्नाथ मारुती कुचेकर यांच्या घोरपडवाडी येथील घोंगडी विणण्याच्या उद्योगास खा. सुप्रियाताई सुळे यांच्या समवेत भेट देऊन ही प्रक्रिया प्रत्यक्ष जाणून घेतली.घोंगडीच्या निर्मितीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट निर्मान करण्याची आज आवश्यकता आहे. जेणेकरून महाराष्ट्राच्या घोंगडीला एक जागतिक पातळीवर ओळख निर्माण होईल. यासाठी आम्ही विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहोत असे माजी खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केले.

एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *