पुणे : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील गणपती माळावर बंद घराच्या दाराचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने १२ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.
सोहन भारत तावरे वय -३० वर्षे, रा.मांडवगण फराटा, गणपती माळ ता.शिरूर जि.पुणे सध्या रा.डोंबिवली ता.कल्याण जि.ठाणे यांनी चोरीच्या या घटनेबाबत शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
शिरूर पोलीसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी सोहन भारत तावरे यांचे वडील कोळगाव येथे शेतीचे डेव्हलपमेंटचे काम चालू असल्यामुळे आले होते. शेतीकामासाठी लागणारे पैसे त्यांनी मांडवगण फराटा येथील घरी कपाटात ठेवून ते परत डोंबिवली येथे घराला कुलूप लावून आले. फिर्यादी सोहन भारत तावरे यांच्या शेतात काम करणारे शेतमजूर बाळासाहेब आंबादास गव्हाळे यास घराची साफसफाई करत असताना त्यांना घराचा कोयंडा तुटलेला दिसला. तेव्हा त्यांनी फिर्यादी सोहन भारत तावरे यांना फोन करून सांगितले की, आपल्या घराचा कोयंडा तुटलेला दिसत आहे असे समजलेवर फिर्यादी सोहन भारत तावरे यांनी त्यांचे वडील व आईला घेवून मांडवगण फराटा येथे घरी आले. घराच्या आतील पाहणी केली असता घरातील सर्व कपाटे उघडी दिसली. घरातील सर्व सामान विस्कटलेले दिसले. फिर्यादी सोहन भारत तावरे यांच्या वडिलांनी ठेवलेली रोख रक्कम १२ लाख ५० हजार रूपये ठेवलेल्या ठिकाणी दिसत नाही असे वडिलांना सांगितल्यावर वडिलांनी व सोहन याने आजूबाजूला शोध घेतला असता ती मिळून आली नाही.
शिरूर पोलीसांनी सोहन भारत तावरे यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार 656/2022 भादवि कलम 380,457 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून प्रभारी पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर पवार या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
विजय ढमढेरे