नांदेड : शेतातील आखाड्याकडे रात्री झोपण्यासाठी गेलेल्या व बैलांना वैरण टाकून रात्री एक वाजता शेतातील पिकाची वन्यप्राणी धुमाकूळ घालीत पिकांचं नुकसान करीत असल्याने बांधावर गेलेल्या गंगाधर जळबा बैलकवाड वय 47 वर्षे या शेतकऱ्याचा वीज पडून दुर्दैवी अंत झाला आहे.
उमरी तालुक्यातील मौजे अस्वलदरी येथील शेतकरी गंगाधर जळबा बैलकवाड वय 47 वर्षे यांनी दिवसभर शेतातील कामे आटोपून सायंकाळी घरी येऊन भोजन करून परत शेतातील आखाड्याकडे झोपण्यासाठी गेले,रात्री अंदाजे एक वाजता उठून शेतातील बैलांना वैरण टाकून शेतातील पिकाची वन प्राण्यांनी नुकसान करीत असल्याने बांधावर गेलेल्याने अचानक वीज कोसळून गंगाधर बैल कवाड या शेतकऱ्याचा जागीच दिनांक 05 ऑक्टोबर 20 22 रोजी रात्री ठीक एक वाजता दुर्देवी अंत झाला. सकाळी घरच्या सदस्यांनी पाहणी केल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्याने येऊन सदर पंचनामा केलेला आहे व अक्समित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
