एक जखमी ; शिरूर तालुक्यातील आंबळे येथील घटना
पुणे : एस टी ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातात ८ वर्षीय मुलगा जखमी झाला.
महादेव ज्ञानोबा गाडेकर वय -४० वर्षे रा. माजलगाव ता.माजलगाव जि.बीड सध्या रा. पांढरेवस्ती ,आंधळगाव ता.शिरूर जि.पुणे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव असून त्यांचा मुलगा आरोह महादेव गाडेकर वय – ८ वर्षे हा अपघातात जखमी झाला आहे.
हा अपघात शिरूर तालुक्यातील आंबळे गावच्या हद्दीत चासकमान कॅनॉल वर शिरूर – चौफुला रस्त्यावर झाला.सोनाली महादेव गाडेकर वय -३० वर्षे व्यवसाय मजुरी व घरकाम रा.माजलगाव, ता.माजलगाव जि.बीड सध्या रा. पांढरेवस्ती ,आंधळगाव ता.शिरूर जि.पुणे यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अपघाताबाबत फिर्याद दिली. तपास अधिकारी ए एस आय अनिल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनूसार ,फिर्यादी सोनाली महादेव गाडेकर यांचे मालक महादेव ज्ञानोबा गाडेकर व मुलगा आरोह महादेव गाडेकर दि.६/१०/२०२२ रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मावशीच्या घरून होन्डा शाईन मोटारसायकलवरून पांढरेवस्ती ,आंधळगावकडे करडे मार्गे आंबळे गावाच्या अलिकडे चासकमान कॅनॉलवर आल्यानंतर समोरून एस टी बस क्रमांक एम एच ०६ एम ८९४२ ही वरील चालक गोवर्धन जनार्दन तातखेडे एस टी आगार शिरूर ता.शिरूर याने त्याच्या ताब्यातील बस विरूद्ध दिशेने अविचाराने, हयगयीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करून भरधाव वेगाने वाहन चालवून अपघातामध्ये महादेव ज्ञानोबा गाडेकर यांच्या मृत्यूस व आरोह महादेव गाडेकर यांचे दुखापतीस व मोटारसायकलचे नुकसान करणेस कारणीभूत झाला.एस टी चालक गोवर्धन जनार्दन तातखेडे या आरोपीवर शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ६८०/२०२२ , भा.द.वि.का.क. २७९, ३३७, ३३८, ३०४अ ,४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ नुसार शिरूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय अनिल चव्हाण या अपघाताचा तपास करत आहेत.
