पुणे : इंदापूर तालुक्यामधील म्हसोबाची वाडी येथे भिगवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते म्हसोबाची वाडी गावा मध्ये रहिवासी असलेले, आदिवासी पारधी समाजातील आदर्श व्यक्ती महत्त्व असलेले हरिदास किसन पवार व सौ पानंवली हरिदास पवार यांना श्रीफळ, शाल व फुल पोशाख तसेच ५५५१/ रुपये देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
आदिवासी समाजात एक आदर्श काम करून वय वर्ष ७८ असून हरिदास पवार यांना गरीबी पायी अनेक संघर्षाला सामोरे जावे लागले आजपर्यंत ते आदिवासी असून देखील कोणत्याही शासकीय सुविधा त्यांनी घेतल्या नाहीत. ते आज देखील गावात भिक्षा मागून खाऊन निस्वार्थपणे आपले जीवन आनंदाने जगत आहेत.
स्वतः उघड्यावर जीवन जगत असून त्यांनी आदिवासी लोकांना शांततेचा संदेश दिला आहे. अशा थोर व्यक्तीचा सन्मान म्हणजे उद्याच्या युगाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल याचा मला विश्वास आहे असे मत दिलीप पवार यांनी व्यक्त केले आहे. माझ्या आयुष्यातील आत्तापर्यंतच्या नोकरीमध्ये पहिल्यांदाच अशा आदर्श व्यक्तीचा सन्मान माझ्या हाताने होत आहे. हे माझे भाग्य समजतो ,असे मत भिगवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी व्यक्त केले आहे. याप्रसंगी शिवराई सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व आदिवासी समाजसेवक साहित्यिक नामदेव भोसले यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार साहेब नामदेव भोसले, सुप्रित भोसले, मनोज चांदगुडे, नामदेव चांदगुडे,राहुल चांदगुडे, लालासो चांदगुडे, अतुल चांदवडे, संतोष भोसले, गणेश पवार, सचिन राऊत, बलवर पवार, सारिका काळे इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे
