पुणे : पुणे – नगर महामार्गावरील कोंढापुरीपासून शिक्रापूरच्या दिशेने ३ किलोमीटर अंतरावर कासारी फाट्याजवळ वाहनचालकांसाठी असलेल्या सुचनादर्शक फलकाची दुरवस्था झालेली आहे.
सावधान पुढे दुहेरी वाहतूक आहे .वाहने सावकाश चालवा हा वाहनचालकांसाठी असलेला सुचनादर्शक फलक नगर – पुणे महामार्गाच्या कडेला असून सुचनादर्शक फलक वाकलेल्या स्थितीत आहे. नगरहून पुण्याच्या दिशेने जाणा-या वाहनचालकांना सुचनादर्शक फलकावरील अक्षरे फलक वाकलेल्या स्थितीत असल्यामुळे दिसून येत नाही. शिक्रापूरहून येणारी वाहने कासारी फाटा येथे उजवीकडे वळून कासारी तसेच निमगाव म्हाळूंगी गावाकडे जात असतात. विठ्ठलवाडी, गणेशमळा,माथेमळई ,तळेगाव ढमढेरे येथील वाहनांना रांजणगाव गणपती येथे जाण्यासाठी कासारी फाटा येथे नगर – पुणे महामार्ग ओलांडून रांजणगावला जावे लागते. नगर ,शिरूर, रांजणगाव गणपती ,कोंढापुरी येथून प्रवास करणारी वाहनेही कासारी फाट्यावरून पुण्याच्या दिशेने प्रवास करत असतात. पुण्याहून शिरूर ,नगरच्या दिशेने जाणारी वाहनेही कासारी फाट्यावरून प्रवास करत असतात. त्यामुळे कासारी फाटा चौक अतिशय गजबजलेला असून वाहनचालकांना पुढे चौक आहे याची कल्पना येण्यासाठी वाकलेल्या स्थितीतील फलकाची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी बुरूंजवाडी येथील ग्रामस्थ दादाभाऊ नळकांडे व प्रवाशांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *