खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे महिलेस 2 लाख 32 हजारांची वैद्यकीय मदतीमुळे उपचार घेऊन परतलेल्या डांगे कुटुंबियांनी खासदार हेमंत पाटील यांचे मानलें आभार.
हिंगोली : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या केंद्रा (बु) गावातील डांगे कुटुंबातील द्वारकाबाई आत्माराम डांगे वय ५४ यां महिलेला गंभीर आजाराची लागण झाल्याने त्याच्या आजारावर उपचार करण्यासाठी सुमारे दोन ते तिन लाख रुपयाचा खर्च लागणार होता. परंतु डांगे कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने इतका पैसा आणायचा कोठून हा मोठा प्रश्न डांगे कुटुंबियांसमोरील उभा राहिला होता तरी देखील खचुन न जाता डांगे कुटुंबियांनी आजाराला लागणारा पैसा उभा करण्यासाठी धावपळ सुरु केली होती दरम्यान खासदार हेमंत पाटील यांच्याशी त्यांनी संपर्क साधुन मदतिची अपेक्षा केली होती खासदार हेमंत पाटील यांनी तत्काळ दखल घेत प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता कोषच्या माध्यमातून डांगे कुटुंबियास दोन लाख बत्तीस हजार पाचशे रुपये इतकी अर्थिक मदत मिळवून दिल्याने ५४ वर्षीय द्वारकाबाई डांगे यांच्यावर औरंगाबाद येथील सिग्मा कॅन्सर हाँस्पीटल मध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. त्यांना रुग्णालयातुन डिस्चार्ज ही मिळाला असुन त्या घरी परतल्या आहे.त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत झाली असून डांगे कुटुंबियांना खासदार हेमंत पाटील यांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे एका कुटुंबातील महिलेचे उपचार घेऊन घरी परतल्या आहे.केंन्द्रा येथील डांगे कुटुंबियांनी खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले असुन खासदार हेमंत पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.