वसमत/हिंगोली (प्रतिनिधी: नंदू परदेशी)

हिंगोली: जिल्ह्यातील होऊ घातलेल्या हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने आणि एकजुटीने लढवणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे जिल्हा समन्वयक आणि माजी सहकार मंत्री मा. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी वसमत येथे झालेल्या बैठकीत हा निर्धार करण्यात आला.

या बैठकीत काँग्रेस पार्टी- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) , शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत निश्चय करण्यात आला की, होऊ घातलेल्या हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक ताकतीने निवडून आणायचे.

या बैठकीला माजी आमदार डॉ.संतोष टारफे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपू पाटील, संदेश देशमुख, ॲड. जकी कुरेशी, हाफीज भाई, विनायकराव भिसे, विनायकराव देशमुख, बाळासाहेब मगर, ॲड.रवि शिंदे, सुनील काळे, डॉ. पार्डीकर, ॲड. ऋषिकेश देशमुख, मुजीब पठाण यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी नंदू परदेशी,

एनटीव्ही न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *