HINGOLI | विश्व हिंदू परिषद संचलित साधू महाराज मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह, शुक्रवार पेठ, वसमत येथे उद्या, दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी, भव्य माजी विद्यार्थी आणि पालक मेळावा तसेच विश्व हिंदू परिषदेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे दीपावलीनिमित्त स्नेह मिलन आयोजित करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून २०० हून अधिक वसतिगृहाचे माजी विद्यार्थी व त्यांचे पालक सहभागी होणार आहेत. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री श्री विनायकरावजी देशपांडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
त्यांच्यासोबतच श्री अनंत जी पांडे (क्षेत्र सहमंत्री), श्री योगेश्वरी गर्गे (देवगिरी प्रांतमंत्री), श्री गणेशजी मोकाशी (प्रांत संघटन मंत्री), श्री कृष्णाजी देशमुख (बजरंग दल प्रांताचे पालक), श्री शैलेश जी पत्की (प्रांत सेवा प्रमुख), प्रा. डॉ. संदीप गोरे (नांदेड विभाग मंत्री), श्री प्रकाश शहाणे (विभाग सेवा प्रमुख), डॉ. निलेश डिग्रसे (तालुका संघ चालक, वसमत), श्री सोपान काळे (जिल्हा उपाध्यक्ष, हिंगोली), श्री गणेश काळे (जिल्हा उपाध्यक्ष, हिंगोली), श्री लक्ष्मीकांत कोसलगे (अध्यक्ष, साधू महाराज वसतिगृह), सन्माननीय संचालक श्री तुळशीराम ताटे आणि श्री महादेव गद्रे अशा विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
हा मेळावा शनिवारी, दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उत्साहात संपन्न होईल. वसतिगृहाचे सन्माननीय संचालक मंडळ आणि संयोजन समितीने विश्व हिंदू परिषदेच्या जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.
प्रतिनिधी नंदू परदेसी, वसमत, हिंगोली.
