नांदेड : नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी. नायगाव येथील मातोश्री कै.सौ.केवळबाई मिरेवाड यांच्या स्मृतीप्रित्यार्थ मराठी साहित्यातील कादंबरी, कथासंग्रह ,कवितासंग्रह आणि बालसाहित्य विभागात दरवर्षी साहित्यिकांना पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून नुकतेच नायगाव येथील व्यंकटेशनगर मध्ये यावर्षीच्या पुरस्काराचे थाटात वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. रवींद्र चव्हाण हे होते तर विशेष अतिथी म्हणून कीर्तनकार ह. भ.प. चंद्रकांत महाराज लाटकर, गटशिक्षणाधिकारी मोहन कदम , गंगाधर मावले, प्राचार्य रमेश कदम हे उपस्थित होते.
कै.सौ. केवळबाई मिरेवाड यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी 2021 या वर्षातील पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावर्षी नांदेड येथील डॉ. सुरेश सावंत यांच्या “गूगलबाबा” आणि मुंबई येथील एकनाथ आव्हाड यांच्या “छंद देई आनंद “या बालकवीतेला, छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. महेश खरात यांच्या “बुर्गांट” आणि कोल्हापूर येथील सुनील देसाई यांच्या “सप्तपर्व” या कादंबरीला ,पुण्याच्या रवी भिसे यांच्या “माझा निषेध झाला पाहिजे” या कवितासंग्रहाला, पालघर येथील सुनील मंगेश जाधव यांच्या “मी आहे” या कथासंग्रहाला आणि धुळे येथील वृषाली खैरनार यांच्या “दुष्टचक्र” या कथेला देण्यात आला तर जिल्हास्तरीय स्थानिक पुरस्कार यावर्षी “अभंग कुणब्याचे आणि इतर कविता” या आनंद पुपलवाड यांच्या काव्यसंग्रहाला तर पंडित पाटील यांच्या “गोड गाणी ” या बाल कवितेला आणि नायगाव येथील व्यंकट आनेराये यांच्या “आम्हाला सौजन्याचा शाप ” या काव्यसंग्रहाला प्रदान करण्यात आला.
डॉ.महेश खरात ,वृषाली खैरनार आणि व्यंकट आनेराये यांची सत्काराला उत्तर म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात भाषणे झाली.
यावेळी साहित्यातून वास्तवता समजते सुखदु:खाची परिसीमा ही साहित्य व्यक्त करते. हा पुरस्कार म्हणजे नायगावच्या इतिहासात ऊर्जादायी उपक्रम ठरत असल्याचे उद्गगार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी काढले. कवी हा वास्तवते बरोबरच कल्पनाविलास मांडतो .त्याला जर संत साहित्याची जोड दिली तर अजरामर काव्य होईल .लोप पावत चाललेले शब्द आपणास साहित्यातून मिळतात म्हणून साहित्य हे भाषा टिकवण्याचे एकमेव साधन असल्याचे प्रतिपादन ह .भ .प .चंद्रकांत महाराज लाटकर यांनी काढले . कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयोजक वीरभद्र मिरेवाड यांनी तर बहारदार सूत्रसंचालन विजय आनेराये यांनी केले . आभार ह. भ .प. त्र्यंबक स्वामी नंदगावकर यांनी मानले. याप्रसंगी ज्ञानेश्वर शिंदे, सोपान देगावकर, गोरखनाथ मिरेवाड, भुरे सर ,परसराम मिरेवाड ,मुख्याध्यापक संजय पचलिंग,देवराव मिरेवाड, दिगंबर कानोले ,हनुमंत वानोळे ,विजय भुसावार,रमेश भद्रे, मोहन बोलवाड, बी.डी. शिंदे ,डी.टी.जाधव ,नरेंद्र खैरनार, बालाजी गिरेबोईनवाड, महेश वानोळकर ,दादाराव वानखेडे ,पांडुरंग पुठ्ठेवाड, उमेश कदम, उत्तम वडजे, शिवाजी शिराढोणे ,संतोष खरकाडे ,वनपाल शिंदे, गोविंद गाजलवाड, नंदकुमार जकापुरे ,प्रेम जोगदंड, गजानन अनुपलवार, व्यंकट गाजलवाड ,पाटील सर मांजरमकर ,जाधव सर मुस्तापूरकर आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *