
नायगाव :- दि.06/10/2022 रोजी मौ. बरबडा येते आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी ठीक 10:00 वाजता पोचेमा मदिर येथे महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली.दुपारी 1:00 वाजता महाप्रसाद भंडारा ठेवण्यात आला. व ठीक 4:00 वाजता महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.या कार्यक्रमाला समाजाचे नेते माजी सरपंच बालाजी मोहनराव मदेवाड,जयंती मंडळाचे अध्यक्ष शंकर पिराजी मदेवाड(तात्या),उपाध्यक्ष दत्ता जेटेवाड,गोविंद रेडेवाद,मारोती गजेवाड,देवराव भंदरवाड,नारायण बोईनवाड,बंडू मदेवाड,माधव मदेवाड,बालाजी किशन उलगुलवाड,गोपाळ कोंपलवाड,गोविंद बायेवाड व मोठ्या संख्येने महादेव कोळी समाज बांधव उपस्थित होते.
एन टीव्ही न्युज
बालाजी शेवाळे
नायगाव नांदेड