तुळजाभवानी मंदिराचं रूप पालटणार
जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे

श्री तिरूमला तिरुपती देवस्थानच्या सर्वांगीण विकासामध्ये खूप मोठा महत्त्वाचा सहभाग असणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी व देवस्थानचे प्रशासकीय प्रमुख श्री.धर्मा रेड्डी यांची भेट घेतली. एकंदरीत देवस्थानचे व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा उभारणी संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी व प्रस्तावित विकास कामांसाठी मार्गदर्शन करण्याच्या हेतूने त्यांना आमंत्रित करण्यात आले. यासाठी तत्काळ त्यांनी होकार दिला व आवर्जून येणार असल्याचे सांगितले.

तुळजापुरला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा व सूचनांचा निश्चितच उपयोग होईल. तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर तुळजापूर देखील विकसित करण्याचा आपला प्रयत्न आहे.

यावेळी आई श्री तुळजाभवानीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.सचिन ओंबासे व शिष्टमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.

प्रतिनिधी आयुब शेख उस्मानाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *