पुणे :-
२६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस व नागरिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिरूर येथील पुणे – नगर रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावर पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या हस्ते २५ हून अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले.
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सह्याद्री देवराई संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात तालुका वनपरिक्षेत्र आधिकारी मनोहर म्हसेकर ,बाजार समितीचे माजी उपसभापती प्रवीण चोरडिया,माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , दिलीप मैड, उपसरपंच गणेश खोले ,भगवान श्रीमंदिलकर , रवि लेंडे तसेच जीवन विकास मंदिर शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते .

पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी यावेळी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रध्दांजली अर्पण केली . शिरुर शहरात विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन केले जात असून काही वर्षात शिरुर शहरात मोठ्या प्रमाणावर झाडे बहरतील असे सांगितले .
सायंकाळी पुणे नगर रोडवरील हुतात्मा स्मारकावर मुंबई वरील २६ / ११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेले पोलिस बांधव व नागरिकाना शहिद वीर जवान अभिवादन समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले .

‘भारत माता की जय’ , ‘शहिद जवान अमर रहे ‘ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या . हुतात्मा स्मारकावर पोलीस उपअधीक्षक यशवंत गवारी ,पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला कार्यकर्त्यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याच बरोबर मुंबई वरील हल्ल्यात शहिद झालेल्या पोलिस बांधवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन, मेणबत्त्या लावून अभिवादन करण्यात आले .
जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर , शशिकला काळे , शोभा परदेशी , वैशाली गायकवाड ,डॉ वैशाली साखरे रवींद्र सानप , आदित्य मैड , आझम सय्यद, गणेश खोले , रवींद्र खांडरे ,फिरोज सय्यद, गोपीनाथ पठारे , खुशाल गाडे , संभाजी कर्डिले यावेळी उपस्थित होते अशी माहिती प्रा.सतिश धुमाळ यांनी दिली.
देशासाठी हुतात्मा झालेल्यां विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे . या कर्तव्य भावनेतून हुतात्मा वीर जवान अभिवादन समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते असे प्रा.सतिश धुमाळ यांनी प्रास्ताविकात सांगितले.
रवींद्र सानप यांनी आभार मानले.
एन टी व्ही न्यूज मराठीसाठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे 8975598628