वाशिम:- हप्ताभरारात मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील झोलाछाप मुन्नाभाईने (बोगस डाॅक्टर) बळी घेतल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा असुन सबंधितांनी आर्थीक देवाणघेवान करुन सर्व प्रकरण मॅनेज केल्याने विषय जागेवरच दबल्या गेल्याची विश्वसनिय सुञाकडुन माहीती मिळाली आहे.दोन बळी जावूनही प्रशासन माञ अनभिज्ञ असल्याचे दिसते.शेलुबाजारमध्ये एका झोलाछापवर कारवाईचा अपवाद वगळता अजुनही बोगस डाॅक्टर आपले बस्तान मांडुन असल्याचे कळते.वरिष्ठांनी रूग्नांच्या जीवाशी खेळणार्या झोलाछापचा कायद्याने समाचार घ्यावा अशी जिल्हावाशीयांमधुन मागणी होत आहे.

मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजारच्या झोलाछाप मुन्नाभाईचे नवनविन अध्याय पुढे येत आहेत.शेलुमधील एक आणि लगतच्या गावचा एक अशा दोघांचा झोलाछाप मुन्नाभाईने चुकीचा ऊपचार केल्यामुळे नाहक बळी गेल्याची परिसरात चर्चा होत आहे.अव…गण आणी चक्रना…..रायण आडनावाचे सदर रूग्न चुकीच्या ऊपचारामुळे हप्ताभरापुर्वी दगावल्याचे कळले.त्यांच्या नातेवाईकांनी याविषयी डाॅक्टरला धारेवर धरले परंतु पैसा आणी मुन्नाभाईच्या धमकीमुळे सर्व फोल ठरले आणी शेवटी प्रकरण मॅनेज केल्याचे समजते.बोगस डाॅक्टरमुळे असे नाहक रूग्नांचे बळी जात असतील तर प्रशासनाने आतातरी कुंभ कर्णी झोपेतुन ऊठुन या झोलाछापला कायद्याचा दणका द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206