लवकरच पोलिसात तक्रार करणार असल्याचे पिडितांनी सांगीतले


वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील एका झोलाछाप मुन्नाभाईवर (बोगस डाॅक्टर) कारवाई केली असुन या मुन्नाभाईचे नवनविन प्रताप आता समोर येत आहेत.एमडी प्रवेशासाठी वाशिम तालुक्यातील एका व्यक्तीकडुन चार लाख ऊकळुन लुबाडणुक केल्याची माहीती समजली असुन पिडित व्यक्ती लवकरच झोलाछाप मुन्नाभाईविरुध्द पोलिसात तक्रार देणार असल्याचे कळले आहे.पोलिसांनी या मुन्नाभाईला ताब्यात घेवुन अजुन अशाप्रकारचे कारनामे करुन कुणाकुणाला लुबाळले याची माहीती करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील झोलाछाप मुन्नाभाईने वाशिम तालुक्यातील एका व्यक्तीकडुन एम डी प्रवेश प्राप्त करुन देतो असे आश्वासन देवुन चार लाख रुपयापैक्षाही जास्त रकमेची लुबाडणुक करुन फसवल्याचा प्रकार पुढे आला असुन या खोटे आमिष दाखवुन फसवणुक करणार्‍या मुन्नाभाईला पोलिसांनी ताब्यात घेवून सत्य ऊजेडात आणावे आणी अजुन कुणाकुणाला कशाप्रकारे फसवले याचा तपास करावा अशी मागणी होत आहे.वाशिम तालुक्यातील व्यक्तीला एम डी च्या प्रवेशाच्या नावावर चार लाखापेक्षाही रुपयाने फसवणुक केली असल्याचे कळले आहे.या झोलाछापने त्या बदल्यात विश्वासार्हर्यता म्हणून दोन चेकही सबंधित व्यक्तीला दिल्याचे समजते.फसवणुक झालेल्या व्यक्तीने आपण फसलो हे लक्षात आल्यानंतर मुन्नाभाईला दिलेली रक्कम काम न झाल्याने परत मागीतली परंतु ऊलट त्यांनाच धमकी देवुन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचीही धमकी त्या झोलाछापच्या घरच्यांनी दिल्याचे कळते.आता न्याय मिळन्यासाठी पोलिसात धाव घेणार असल्याचे पिडित व्यक्तीकडुन समजले.पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास करुन सत्य ऊजेडात आणावे आणी एमडी साठी खरच पैशाची देवानघेवान होत होती का?आणी यामध्ये झोलाछाप मुन्नाभाईला अजुन कोणकोण साथ देत होते का?याचाही शोध लावावा अशी मागणी आता जनतेमधुन होत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *