बोगस डाॅक्टरच्या बिर्हाडावर धाडसञ सुरु करुन कागदपञाचे व्हेरिफिकेशन करणे गरजेचे
आतातरी रूग्नांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा,लोकांची मागणी
छोलाछापचे वाढते प्रमाण अधिवेशनात लक्षवेधी ठरणार
वाशिम : परवानगी नसतांना तसेच पाञता नसुनही वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर शहर व शेलुबाजार परिसरातील काही झोलाछाप मुन्नाभाई रूग्नांना सलाईनही टोचतात व इंजेक्शनही देतात.सोबतच ज्या औषधी रूग्नांना देन्याची परवानगी व पाञता नसुन पण लिहुन आणी प्रसंगी स्वतःजवळीलही औषधसाठा बोगस बिर्हाड चालवतांना वापरत असल्याचा गंभीर प्रकार सुरु असल्याचि विश्वसनिय सुञाकडुन माहीती मिळाली आहे.या झोलाछापजवळ औषधसाठा येतो कुठुन?खुलेआम दवाखाना नावाचे बिर्हाड थाटतात तरीही सबंधित अधिकार्यांना साधी कुणकुणही लागु नये? हे आश्चर्याची बाब असल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे.आता वरिष्ठांनीच या झोलाछाप मुन्नाभाईवर धाडसञ सुरु करुन पाञतेच्या कागदपञाची व्हेरिफिकेशन करावी अशी मागणी जनमाणसातुन होत आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार परिषदेचे नोंदणीकृत डाॅक्टर फक्त त्यांच्या पॅथीची व अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करू शकतात.महाराष्ट काॅन्सिल आॅफ इंडीया(MBBS),महाराष्ट काॅन्सिल आॅफ इंडीअन मेडिसिन(BAMS),महाराष्ट काॅन्सिल आॅफ होमिओपॅथी(BHMS),डेंटल काॅन्सिल आॅफ इंडीया(BDS)हे काॅन्सिलमध्ये पंजिकृत असलेले डाॅक्टर्स फक्त नियमाने त्यांच्या तसेच अॅलोपॅथीची प्रक्टीस करु शकतात.परंतु मंगरुळपीर शहरात,शेलुबाजारमध्ये व वाशिम जिल्ह्यातील ठिकठिकाणी झोलाछाप मुन्नाभाईजवळ कोणत्याही सरकारी विद्यापिठाची परवानगी नसतांना व कोणत्याही परिषदेचे पंजीकृत असल्याचा दाखला नसतांनाही बिनधास्त बिर्हाड थाटुन रूग्नांची आर्थीक लुट करुन जिवाशी खेळत असल्याचा प्रकार सुरु असल्याची चर्चा आहे.शेलुबाजारच्या त्या झोलाछापने तर दुसर्याच डाॅक्टरचा रजिष्टर नंबर वापरुन दुकान थाटले होते असे ऐकिवात आहे.बर्याच झोलाछाप मुन्नाभाईजवळ वैद्दक व्यवसायाची कोणतीही शैक्षणिक पाञता नसतांना व परिषदेचे नोंदणी प्रमाणपञ नसतांनाही ते खुलेआम बिएएमएस,योगा व नैसर्गीक ऊपचार(नॅचरोपॅथी) आणी अॅक्युपंचर व अॅक्युप्रेशरसारख्या डिग्रीचा वापर करुन सर्रास अॅलोपॅथीच्या मेडिसिनचा वापर करुन रुग्नांना इंजेक्शन,सलाईन टोचुन औषधीही देतात.हा रुग्नांच्या जीवाशी खेळ आहे.काही बहाद्दर तर इतर डाॅक्टरचा पंजिकृत नंबर वापरण्यापर्यतही मजल मारतांना दिसत आहेत.अशा झोलाछाप मुन्नाभाई डाॅक्टरांना आॅवश्यक औषधसाठा पुरवते तरी कोण?तसेच या झोलाछापची डिग्री मान्यताप्राप्त नाही हे माहीती असुनही मेडीकलवाले अशा झोलाछापनी लिहिलेल्या औषधी विकतात तरी कसे हा मोठा गहन प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे.अशा झोलाछापना औषधी पुरवणार्या मेडीकलवरही कायदेशीर कारवाई होणे आता गरजेचे असल्याची मागणी लोकांमधुन होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शेलुबाजार डाॅक्टर अशोशियेशनने प्रशासनाला दिलेल्या लेखी तक्रारीसोबत प्रत्येक बोगस डाॅक्टरच्या अक्षराने रुग्नांना लिहुन दिलेल्या अॅलोपॅथीच्या औषधाचे त्यांच्या त्यांच्या नावाने प्रिक्सिपशन सुध्दा जोडलेले असल्याचे कळले.तरी सुध्दा प्रशासनाला याची जाण व गांर्भीर्य का नाही?हा मोठा यक्षप्रश्न असल्याचे दिसते.पुराव्यासह,बोगस डाॅक्टरच्या नावासह अशोशियेशन तक्रार देते तरीही कारवाई होत नाही?मग पाणी नेमके कुठे मुरत आहे?अशा झोलाछाप मुन्नाभाइंना कोणत्या सरकारी अधिकार्यांचे अभय आहे?हे गुढ ऊकलने आता गरजेचे आहे.कर्तव्यदक्ष जिल्हाधिकार्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देवून बोगस डाॅक्टरविरोधात धाडसञृराबवुनृकायदेशीर कारवाई करावी.वाशिम जिल्ह्यातील वाढते बोगस डाॅक्टरचे प्रमाण पुराव्यासह येणार्या अधिवेशनात लक्षवेधी ठरणार आहे तेव्हा ऊत्तर देता देता सरकारी खाबुगीरींना घाम फुटणार आहे हे माञ निश्चित असल्याचे कळले आहे.बोगस डाॅक्टरची कुठलीही गय करु नये व अशा झोलाछापला सरकारी अधिकारीही अभय देत असतील अशा मलिदा खाणार्या अधिकार्यांवरही कारवाई व्हायला हवी अशी मागणी जिल्हावाशीयांमधुन होत आहे.
प्रतीनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206