वाशिम जिल्ह्यात बोगस लॅबचे पेव
वाशिम: – सध्या वाशिम जिल्ह्यात व मंगरुळपीर शहर व शेलुबाजारमध्ये बोगस लॅबचे पेव फुटले असुन पाञता व नोंदणीकृत नसतांनाही ऊठसुठ कुणीही लॅब थाटुन रूग्नांची आर्थीक पिळवणुक व जीवाशी खेळ करण्याची दुकानदारी थाटली असल्याने अशा बोगस लॅबवर कारवाईचे मुर्हुर्त माञ प्रशासनाला अजुनही सापडत नसल्याची खंत जिल्हावाशी व्यक्त करत आहेत.
झटपट पैसे कमवण्याच्या नादात कुणाचा जीवही गेला तरी बेहत्तर असा वैदक शास्ञात गोरखधंदा सुरु असल्याचे एकंदरीत चिञ आहे.वाशिम जिल्ह्यामध्ये तसेच मंगरुळपीर शहर आणी शेलुबाजार या ठिकाणी अवैधरित्या बोगस लॅब थाटुन सर्रास रुग्नांची आर्थीक लुट व जिवाशी खेळ सुरु असल्याचे दिसते.प्रसारमाध्यमांनी याविषयी जागृती केल्यामुळे अशा बोगस झोलाछापचे धाबे दणानले.काही बोगस लॅबवाल्यांनी आपल्या लॅबचे शटर बंद केले तर काहींनी बोर्डही ऊतरवले परंतु अजुनही बरेचसे मुजोर बोगस पॅथी सुरु असल्याची चर्चा आहे.प्रशासनाने लवकर कारवाईचा मुहुर्त शोधावा व बोगस लॅबवर छापेमारी करुन त्यांच्याजवळच्या कागदपञांचे व्हेरिफिकेशन करावे.शासनाची दिशाभुल करुन अनधिकृत बोगस लॅबवर कायदेशीर कारवाई करुन सबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशीही मागणी होत आहे.

लॅब,दवाखाना सुरु करण्यासाठीच्या परवानगीला झोलाछापची बगल
कोणताही दवाखाना,लॅब सुरु करन्यासाठी त्या क्षेञातील नगरपरिषद किंवा ग्रामपंचायतची एनओसी घ्यावी लागते त्याकरीता आवश्यक ती कागदपञे जोडुन अर्ज करावा लागतो.मग जर अशा बोगस लॅब परिसरात सुरु आहेत तर मग त्यांनी प्रशासनाची एनओसी घेण्यासाठी कोणती कागदपञे सादर केली हे पाहणे आता आवश्यक बनले आहे.काहींनी बोगस दवाखान्या व लॅब सुरु करण्यासाठी लागणारी एनओसीची प्रक्रीयाच पुर्ण केलेली नसु शकते.अशावरही चौकशी करुन फौजदारी दाखल करन्याची मागणी होत आहे.
अनधिकृत वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचेवर कारवाई करण्याच्या आदेशाचे काय झाले?
महाराष्ट्र पेशवैद्यक परिषद अधिनियम २०२१ (ACT VI of २०१६)
महाराष्ट्र परावैद्यक अधिनियन २०११ मबिल कलन ३१ पोट कलम (१) मध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिनियनाखाली तयार केलेल्या व ठेवलेल्या राज्य नोंदवहीत ज्याच्या नावाची नोंद करण्यात आली आहे त्या वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञास परिषद नोंदणी क्रमांक व प्रमाणपत्र देते अशा परावैद्यक व्यावसायिकां खेरिज इतर कोणत्याही व्यक्तीस, परावैद्यक व्यावसायिक म्हणून स्वतंत्रपणे वा एम.डी. पॅथोलॉजी, कार्पोरेट
लॅब मधे तंत्रज्ञ म्हणून व्यवसाय वा कान-करता येणार नाही. तरीही महाराष्ट्र परावैद्यक परिषद अनुसुची मध्ये समाविष्ट नान्यताप्राप्त मेडिकल लॅबोरेटरी टेक्नोलॉजी पदवी, पदविका नसताना व महाराष्ट्र परावैद्यक
परिषद नॉटणी नसताना अनेकजण राज्यात क्लिनिकल लेबोरेटरी थाटुन वा कार्पोरेट पॅथ लॅब चे रक्त नमुने
संकलन करणारे तंत्रज्ञ म्हणून घरो घरी जाउन रक्ताचे नमुने घेतात व अवास्तव शुल्क आकारणी करुन तसेच महाराष्ट्र परावैद्यक परिषद व कायद्याचे उल्लंघन करून रुग्णांच्या आरोग्याशी खेळत आहेत.यात कार्पोरेट पॅथोलॉजी लॅबोरटरिज व बऱ्याच एम डी पॅथोलॉजी डॉक्टर हे अप्रशिक्षित व महाराष्ट्र परावैद्यक परिषदेची नोंदणी नसलेल्या व्यक्तींना कमिशन देउन अशा बोगस सिरीजना बढावा देत आहेत.
(२) पोटकलम (१) च्या तरतुदिंचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस, अपराध सिध्दी नंतर (क
पहिल्या अपराधासाठी, तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि पाच हजा
रुपयांहून कमी नसेल परंतु दहा हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल आणि (ख
दुसऱ्या किंवा त्यापुढील अपराघासाठी, दहा वर्षांपर्यंत असु शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि
पंचवीस हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा सदर अधिनियमाच्या तरतुदित आहे.
(३) पोट कलम (२) खालिल सर्व अपराध हे दखलपात्र व अजामीनपात्र आहेत. त्यामुळे रुग्णांचे आर्थिक नुकसान व चुकिच्या उपचारांना बळी पडाव लागत आहे.राज्यात जिल्हा,तालुका व तहसिल पातळीवर असलेल्या प्रशासकीय अधिकारी,आरोग्य अधिकारी,पोलीस अधिकारी यांनी या बाबीची तात्काळ दखल घेवुन महाराष्ट परावैद्यक अधिनियम कलम ३२ नुसार नोंदनिकृत नसलेल्या व्यक्तीवर कारवाई करावी असे सबंधितांना दि.07/05/2021 रोजी प्रबंधक महाराष्ट पॅरावैद्दक परिषद मुंबई यांना दिले आहे.तरीही यावर प्रशासनाची बोगस लॅबवर कारवाची अनास्था दिसुन येत असुन अजुनही या झोलाछापवर कारवाईचे मुहुर्त सापडलेच नाही का अर्शी चर्चा लोकांमध्ये रंगत आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206