⚡ “दोन वर्षांत ऊसाचं बिल नाही… पण म्हेत्रे साहेबांचं राजकारण सुरूच!”
💥 “शेतकऱ्यांना थकबाकी नाही, म्हणे आश्वासन पुरे! संतप्त शेतकऱ्यांचा इशारा: आता आम्ही गप्प बसणार नाही!!”

सोलापूर: माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २०२३–२०२४ चे थकित बिल न दिल्यामुळे जिल्हाभरातील शेतकरी आक्रोशित झाले आहेत. दोन वर्षांपासून पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था बिकट झाली असून, कारखान्याचे व्यवस्थापन आणि संबंधित अधिकारी मात्र मौन बाळगत आहेत.
या अन्यायकारक वर्तनाविरोधात शेतकरी संघटनेने अमरण उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला असून, हे उपोषण माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या निवासस्थानी, क्रॉस चौक, जोधमाळी पेठ, सोलापूर येथे सोमवारी (दि. १३ ऑक्टोबर २०२५) पासून सुरू होणार आहे.

🔥 शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न : “आमचं ऊसाचं बिल कुठं गेलं?”
कारखान्याने सुरुवातीला काही शेतकऱ्यांना ₹२१००० प्रमाणे पैसे दिले, काहींना फक्त ₹८००० दिले, आणि हजारो शेतकऱ्यांना अजूनपर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही!
वारंवार निवेदनं देऊनही म्हेत्रे यांच्या मातोश्री कारखान्याकडून प्रतिसाद नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वादळ उसळलं आहे.
शेतकरी म्हणतात —
“म्हेत्रे साहेब निवडणुकीत आमच्या दारात येतात, पण ऊसाचं बिल देताना गायब होतात! आता आम्ही शांत बसणार नाही!”
⚡ शासनाच्या भूमिकेवर शंका :
राज्य सरकार शेतकऱ्यांना आश्वासनं देत आहे, पण प्रत्यक्ष कृती होताना दिसत नाही. शेतकरी विचारत आहेत —
“सरकार म्हेत्रे यांना का पाठीशी घालतंय? शेतकरी आत्महत्या करत आहेत, आणि मंत्री मात्र फोटोंमध्ये व्यस्त आहेत!”
⚖️ शेतकऱ्यांच्या मागण्या :
1️⃣ सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकित बिल तात्काळ अदा करावे.
2️⃣ मातोश्री साखर कारखान्याच्या व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करून चौकशी करावी.
3️⃣ दोन वर्षांपासून न दिलेल्या बिलावर व्याजासह रक्कम द्यावी.
4️⃣ कारखान्याचा परवाना तात्काळ स्थगित करावा.
5️⃣ शासनाने कारखान्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निरीक्षण समिती स्थापन करावी.
🚨 शेतकऱ्यांचा इशारा:
“जर बिल दिलं नाही, तर आम्ही म्हेत्रे यांच्या घरासमोर सामूहिक आत्महत्या करू! आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, आता आम्ही शेवटपर्यंत लढू!”
संतप्त शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की —
“राजकारणाच्या नादात आमचा जीव गेला तर त्याची पूर्ण जबाबदारी सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावर असेल!”
📍 स्थळ:
मा. सिद्धाराम हेत्ते यांचा निवास, क्रॉस चौक, जोधमाळी पेठ, सोलापूर
📞 संपर्क : 7066820302 / 9423410410
✊ “उठ बळी राजा, जागा हो — आता न्याय मिळवण्यासाठी रणशिंग फुंकण्याची वेळ आली आहे!”
प्रतिनिधी आयुब शेख,
एनटीव्ही न्यूज मराठी, सोलापूर.