- भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचा आठवा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ उत्साहात संपन्न..!

उमरगा (धाराशिव): उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथे रविवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना संचलित क्वीनर्जी इंडस्ट्रीज लि. च्या सन २०२५ च्या आठव्या ऊस गळीत हंगामाचे बॉयलर पूजन व अग्नीप्रदीपन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
कारखान्याचे चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार यांनी यावेळी बोलताना शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय गाळप बंद करणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. यासोबतच, योग्य व वेळेत ऊस बिल शेतकऱ्यांना मिळेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
प्रा. बिराजदार यांनी कारखान्याच्या स्थापनेपासूनची संघर्षमय वाटचाल यावेळी सांगितली. ते म्हणाले, “आज भाऊसाहेब बिराजदार कारखान्यामुळे जिल्हाभरातील कारखान्यांचा ऊस दर पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मिळत आहे.” यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यंदाचे मोठे उद्दिष्ट:
- गाळपाचे उद्दिष्ट: १० लाख मे. टन ऊस गाळप.
- तोडणी व वाहतूक यंत्रणा: ३३९ ट्रॅक्टर, १८५ मिनी ट्रॅक्टर, २०० बैलगाड्या, २५ हार्वेस्टर.
चेअरमन प्रा. बिराजदार यांनी ऊस उत्पादकांना गाळपासाठी संयम ठेवण्याचे आणि जास्तीत जास्त ऊस भाऊसाहेब बिराजदार कारखान्याला पुरवठा करण्याचे आवाहन केले.
मान्यवरांच्या उपस्थितीत बॉयलर पूजनआठव्या गळीत हंगामाच्या बॉयलरचे पूजन संचालक राजेंद्र माने व सौ. मीना माने यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बॉयलर अग्नीप्रदीपन कारखान्याचे चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार यांच्यासह संचालक साहेबराव पाटील, व्यंकटराव सोनवणे, योगीराज कदम, इमाम पटेल, तुकार्राम बिराजदार आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. सिद्राम जाधव, भिमा स्वामी, मारुती पाटील, नेताजी कवठे, राम जाधव, अशोक कारभारी, महेश भगत, सुनील साळुंखे, शमशोद्दीन जमादार, दत्ता वाडीकर, शिवाजी पवार, सचिन सरवदे यांच्यासह अनेक पदाधिकारी या समारंभास उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर बी.जे. पाटील, चीफ इंजिनीयर आर.पी. मीरगळ, चिफ केमिस्ट एस.बी. पांढरे, डिस्टीलरी मॅनेजर डी.बी. कोळगे, शेतकी आधिकारी ए.आर. शेंडगे, एस.एस. त्रिगुळे तसेच तुकाराम बिराजदार, योगीराज स्वामी, संजय जाधव, अजित पाटील, प्रताप महाराज यांच्यासह उमरगा व लोहारा तालुक्यातील मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
प्रतिनिधी सचिन बिद्री,
एनटीव्ही न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.