प्रतिनिधी – आयुब शेख, नळदुर्ग
नळदुर्ग नगरपरिषदेच्या निवडणुका जवळ आल्या असून शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अनुभवी, अभ्यासू आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात घर केलेले माजी नगरसेवक इमाम शेख यांनी पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक ८ मधून तयारीला सुरुवात केली आहे.
🔹 पाच वेळा नगरसेवक – एकदा उपनगराध्यक्ष
इमाम शेख यांनी 1991, 1996 आणि 2000 या तिन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरून सलग विजय मिळवला.
त्यानंतर 2006 मध्ये काँग्रेसने तिकीट नाकारल्याने, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वबळावर निवडणूक लढवून थेट विजय मिळवला.
यानंतर 2012 ते 2016 दरम्यान पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून निवडून येत, उपनगराध्यक्ष तसेच पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्य आणि निवेदन समितीचे सभापती म्हणून शहराच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
🔹 “८०% समाजकारण – २०% राजकारण”
राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे इमाम शेख हे “गोरगरिबांचे कैवारी” म्हणून ओळखले जातात.
ते श्रावणबाळ, संजय गांधी, इंदिरा गांधी स्वयंरोजगार योजना अशा विविध शासकीय योजनांचा लाभ सर्व समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या ३० वर्षांपासून अविरत प्रयत्नशील आहेत.
शहरातील शांतता, सौहार्द आणि विकास राखण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या कामामुळे नागरिकांचा त्यांच्यावर ठाम विश्वास आहे.
🔹 सर्व धर्मीयांचा विश्वास संपादन
हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देत, सर्व धर्मीयांमध्ये समान जनसंपर्क राखणारे इमाम शेख यांचा प्रभाव शहरातील सर्व समाजघटकांमध्ये आहे.
त्यामुळे विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते त्यांना खुलेपणाने पाठिंबा देताना दिसत आहेत.
🔹 “पुन्हा सेवा करण्याची संधी द्या” — इमाम शेख
मोर्चेबांधणीची सुरुवात करताना इमाम शेख म्हणाले,
“शहरवासीयांच्या आशीर्वादाने आणि विश्वासाने मी नेहमीच सेवा केली आहे. पुन्हा एकदा नागरिकांनी सेवा करण्याची संधी द्यावी, हीच माझी माफक अपेक्षा आहे.”
शहरातील विकासकामांमध्ये त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग आणि प्रामाणिक जनसंपर्क लक्षात घेता, प्रभाग क्रमांक ८ मधून इमाम शेख पुन्हा निवडून येण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
NTV NEWS MARATHI
प्रतिनिधी – आयुब शेख, नळदुर्ग
📞 9975177475