नळदुर्ग प्रतिनिधी:
दिवाळी सणानिमित्त नागरिक मोठ्या संख्येने गावी किंवा पर्यटनासाठी जात असल्याने बंद घरांवर चोरीचा धोका वाढतो. त्यामुळे नळदुर्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन यादव यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केलं आहे.
यादव म्हणाले, “घर सोडताना दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. शक्यतो बँक लॉकरचा वापर करा. प्रवासापूर्वी शेजाऱ्यांना किंवा स्थानिक पोलिसांना माहिती द्या, जेणेकरून बंद घरांवर लक्ष ठेवणे सोपे होईल.”
🔹 निरीक्षक यादव यांचे मार्गदर्शन — सुरक्षा लक्षात ठेवा:
1️⃣ प्रवासाला जाताना दागिने परिधान करणे टाळा.
2️⃣ संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा.
3️⃣ कुलूप, ग्रील, खिडक्या व्यवस्थित बंद करा.
4️⃣ शेजाऱ्यांना प्रवासाची कल्पना द्या.
5️⃣ महिलांनी प्रवासादरम्यान साधेपणाने वावरणे योग्य.
6️⃣ सोशल मीडियावर प्रवासाची माहिती शेअर करू नका.
यादव यांनी सांगितले की, “दिवाळीचा आनंद साजरा करताना सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केल्यास चोरीच्या घटना टाळता येतात.”
नळदुर्ग पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष गस्ती मोहीम सुरू केली आहे. बंद घरांची तपासणी, बाजारपेठ परिसरात अतिरिक्त पोलिसांची तैनाती आणि सीसीटीव्हीद्वारे वाढीव देखरेख सुरू करण्यात आली आहे.