उल्हासनगर (ठाणे) : उल्हासनगर येथील ठाणे जिल्हा महिला बालविकास विभाग संचलित महिला बालसुधारगृहातून सहा मुलींनी पलायन केल्याची धक्कादायक घटना २७ ऑगस्ट रोजी घडली होती. यातील दोन मुलींना शोधण्यात यश आले असून, चार मुली अजूनही बेपत्ता आहेत.

उल्हासनगर येथील महिला बालसुधारगृहातून सहा मुलींनी पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यातील चार मुली सापडल्या असल्या, तरी दोन मुली अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं काम करत आहेत. याच महिला सुधारगृहातून काही महिन्यांपूर्वीही आठ मुलींनी सुरक्षा भिंत ओलांडून पळ काढला होता. यामुळे बालसुधारगृहाच्या कारभाराविषयी अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या घटनेमुळे सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन यावर काय पाऊल उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
एनटीव्ही न्यूज मराठी, उल्हासनगर.