वाबळेवाडी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
पुणे :-
वाबळेवाडी ता.शिरूर येथील शाळेतील उपक्रमशील व शिष्यवृत्ती तज्ञ शिक्षिका शारिफा तांबोळी यांना १०० शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे आयोजित राज्यस्तरीय शिक्षक सेवागौरव पुरस्कार जालना येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष औरंगाबाद येथील उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
औरंगाबाद येथील शिक्षण उपनिरीक्षक मा.डॉ सतीश सातव, माध्य.-जि.प.जालना येथील शिक्षणाधिकारी मंगल धुपे, जालना येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा उद्योजक, सुनिलभाई रायठठ्ठा आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
शाळेचे शिक्षक सचिन बेंडभर यांनी ही माहिती दिली.

येथून पुढील काळात विद्यार्थी आणि शाळेसाठी अशाच प्रकारचे काम करून शाळेच्या गुणवत्ता विकास वाढीसाठी प्रयत्न करीन. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय समोर ठेवून आपल्या सर्वांच्या सहकार्याने शाळा प्रगतीपथावर नेण्याचे काम करत राहील, असे यावेळी सत्कारमूर्ती वाबळेवाडी शाळेच्या उपमुख्याध्यापिका शारिफा तांबोळी यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी औरंगाबाद येथील शिक्षण उपनिरीक्षक मा.डॉ सतीश सातव, माध्य.-जि.प.जालना येथील शिक्षणाधिकारी मा.मंगल धुपे, जालना येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा उद्योजक, मा सुनिलभाई रायठठ्ठा आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी संयोजकांकडून सर्वांचे आभार मानण्यात आले.
जालना येथे १०० शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे आयोजित राज्यस्तरीय शिक्षक सेवागौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे समजल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार हस्ते शारिफा तांबोळी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. वाबळेवाडी शाळेतील उपक्रमशील व शिष्यवृत्ती तज्ञ शिक्षिका म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे.
पुरस्कार प्रदान होताच आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
एन टी व्ही न्यूज मराठीसाठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी
ता.शिरूर जि.पुणे
8975598628