शिरूर तालुक्यातील इनामगाव शिव, तांदळी शिवरस्ता दुरूस्त करण्याची मागणी अंबादास संपत गोसावी यांनी केली आहे.
इनामगाव शिव, तांदळी शिव हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग ५४८ ला जोडून माळवाडीकडे जात आहे. हा रस्ता मांडवगण ,इनामगाव, तांदळी,कळसकरवाडी माळवाडी येथील सर्व शेतक-यांना फायदेशीर असून रस्त्याच्या आजूबाजूला खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यामध्ये ३ किलोमीटर अंतर असलेल्या या रस्त्यावरून कोणत्याही प्रकारचे वाहन जात नाही. पावसाळ्यात गुरांचा चारा,घास,कडवळ, मका पिकाची शेतक-यांना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे डोक्यावरून वाहतूक करावी लागते असे अंबादास गोसावी यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुचनेनुसार मागणी केलेल्या तांदळी म्हसोबावाडी रोड ते मळई या रस्त्यासाठी १० लाख, इनामगाव शिव रस्ता १० लाख, गणेगाव दुमाला येथील प्रजिमा १०० ते कुदळेवस्ती रस्ता दुरूस्त करण्यासाठी ७ लाख ,बाभूळसर बुद्रूक ते गणेगाव दुमाला रस्ता दुरूस्त करणे, म्हसोबावाडी ते बाभूळसर बुद्रूक रस्ता दुरूस्त करण्यासाठी ३० लाख रूपये निधी मंजूरीसाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. या रस्त्यांच्या कामांना अद्याप सुरूवात करण्यात आलेली नाही असे अंबादास संपत गोसावी यांनी सांगितले.
एन टी व्ही न्यूज मराठीसाठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी
ता.शिरूर जि.पुणे
8975598628