पुणे : क्रिडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या खेळाचे कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध होते असे मत शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांनी व्यक्त केले.
युवा संचालनालय व चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय यांच्या वतीने शिरुर तालुका मैदानी स्पर्धांंचे आयोजन शिरूर येथील बोरा महाविद्यालयात करण्यात आलेले आहे.या स्पर्धांचे उद् घाटन निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
उद् घाटनप्रस़ंगी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव निकम बोलत होते.
प्राचार्य डॉ. के.सी.मोहिते, महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. डॅनियल मंडलिक उपस्थित होते .
दोन दिवस चालणा-या या स्पर्धेत तालुक्यातील शाळेचे संघ सहभागी झाले असून धावणे, क्रॉसकंट्री ,लांब उडी ,उंच उडी , तिहेरी उडी , आदी मैदानी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्रीडाशिक्षक अप्पासाहेब चव्हाण , प्रा योगेश आव्हाड , प्रा. डॉ. पी .आय .वीरकर आदी प्रयत्नशील आहेत.
विजय ढमढेरे
