पुणे :- संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच मांजरी, हडपसर यांच्या वतीने देण्यात येणारा,प्रतिष्ठेचा मानला जाणारा उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार प्रसिद्ध बालसाहित्यिक सचिन बेंडभर यांच्या दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या वाघोबाचा मोबाईल या काव्यसंग्रहास ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत, मसाप पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष, राजनजी लाखे व पुणे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी, प्रसिद्ध साहित्यिक अनिल गुंजाळ यांच्या हस्ते शिक्षक भवन, गांजवे चौक, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या काव्यसंग्रहास २०२१ सालचा हा तिसरा पुरस्कार असून सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच मांजरी, हडपसर यांच्या वतीने २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या साहित्यास राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङमय पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रवेशिका आल्या होत्या. बालसाहित्य विभागात पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बालसाहित्यिक सचिन बेंडभर यांच्या वाघोबाचा मोबाईल या बालकाव्यसंग्रहाला द्वितीय क्रमांक मिळाला असून प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत, मसाप पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष, राजनजी लाखे व पुणे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी, प्रसिद्ध साहित्यिक अनिल गुंजाळ यांच्या हस्ते शिक्षक भवन, गांजवे चौक, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. जेष्ठ गझलकार मसूद पटेल, शिवाजी साहित्यपीठ जुन्नरचे अध्यक्ष, कवी शिवाजी चाळक, विजय लोंढे, हृदयमानव अशोक आदी मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना नेवकर, स्वागत कांचन मून तर आभार रणजित पवार यांनी मानले. सचिन बेंडभर यांच्या काव्यसंग्रहास २०२१ सालचा हा तिसरा पुरस्कार असून याआधी सातारा येथील कुंडल कृष्णाई पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मसाप पुरस्कार असे प्रतिष्ठेचे मानले जाणारे पुरस्कार या बालकाव्यसंग्रहास मिळाले आहेत. या बालकाव्यसंग्रहासाठी २०२२ सालचा हा मानाचा सन्मान असून या काव्यसंग्रहास निवड समितीने द्वितीय क्रमांक जाहीर केला आहे. दिलिपराज प्रकाशनने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला असून प्रसिद्ध चित्रकार संतोष घोंगडे यांनी विषयाला अनुरूप चित्रे व आकर्षक मुखपृष्ठ रेखाटले आहे. किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे. प्रसिद्ध बाल साहित्यिक सचिन बेंडभर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एन टी व्ही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर ( पुणे ) 8975598628