पुणे :-
पांजरपोळ संस्थेने केलेल्या
वृक्षतोडी व शासकीय भिंज तोडीबाबत गांभीर्याने दखल घेवून त्वरीत कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी शिरूर नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत शिरूर नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी म्हटले आहे की, नगरपरिषद हद्दीतील ‘पांजरपोळ’या संस्थेने अमरधाम शेजारील जागेतील मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केलेली आहे. त्यामध्ये आंबा, लिंब,शिसम, निलगिरी इ.अनेक झाडांची कत्तल केलेली आहे.
त्याचबरोबर आपल्या ‘अमरधाम’ संरक्षक भिंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे. सदर बाबीची आपण गांभीर्याने दखल घेवून त्वरीत कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे
एन टी व्ही न्यूज मराठीसाठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे
कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे
8975598628