पुणे ;-
शिरूर वाहतूक पोलिसांकडून शिरूर शहरामध्ये सिटीबोरा कॉलेज रोड, निर्माण प्लाझा, BJ कॉर्नर या ठिकाणी बेशिस्त वाहन चालकांच्या 42 वाहनांवर कारवाई करत 74,500/- रुपये दंड आकारण्यात आला.
पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे यांनी ही माहिती दिली.
शिरूर शहरामध्ये विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट , नंबर प्लेटवर नाव टाकणे, ट्रिपल सीट, विना लायसन, भरधाव वेगात मोटर सायकल चालवणे अशा वाहन चालकांवर माहे सप्टेंबर महिन्यामध्ये 564=3,78,900/-,
ऑक्टोबर महिन्यामध्ये 661=4,78,500 व
नोव्हेंबर महिन्यामध्ये 594= 5,27,500/- असे मागील तीन महिन्यांमध्ये एकूण 1819 वाहनांवर कारवाई करत 13,84,900/- रू दंड करण्यात आला. यापुढे ही कारवाई अजून तीव्र करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी वाहतूक अंमलदारांना दिले असून सदरची कारवाई म.पो.स.ई.सुजाता पाटील निर्भया पथक, सहाय्यक फौजदार अनिल चव्हाण, पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे, महिला पोलीस नाईक भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, पोलीस अंमलदार वीरेंद्र सुंबे यांच्या वाहतूक शाखेमार्फत करण्यात आलेली आहे असे पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे यांनी सांगितले.
आपल्या 18 वर्षाखालील लायसन नसलेल्या पाल्यांना मोटर सायकल चालविण्यास देऊ नये अन्यथा वाहन मालक (पालक ) यांच्यावर कारवाई करण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी केले आहे.
एन टी व्ही न्यूज मराठीसाठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे
शिरूर (पुणे)
8975598628
