* * @package Newsup */?>
भांबर्डे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांकडून वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके | Ntv News Marathi
शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्रातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणा-या वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मार्गदर्शक शिक्षक विठ्ठल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. ते पाहून वाबळेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनीही यात सहभागी होवून मल्लखांब कसरतीचा अनुभव घेतला.यावेळी भांबर्डे शाळेतील विद्यार्थ्यांनी वैयक्तिक तसेच सामुहिक मल्लखांब कसरती सर्वांपुढे करून दाखविल्या. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या विद्यार्थ्यांना मनमुराद दाद दिली. शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, शिष्यवृत्ती तज्ज्ञ एकनाथ खैरे, साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर ,विद्या सपकाळ, सुनील पलांडे, जयश्री पलांडे, क्रिडाशिक्षक पोपट दरंदले, किरण अरगडे, गोरख काळे, प्रतिभा पुंडे, तुषार सिनलकर,संदीप गिते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाबळे, उपाध्यक्ष मल्हारी वाबळे आदींसह ग्रामपंचायत ,तंटामुक्त गावसमितीचे पदाधिकारी,ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. मल्लखांब कसरती या आजकाल कालबाह्य झालेल्या दिसत असून शरीर सदृढ करण्यासाठी मल्लखांब कसरती या आवश्यक असतात .मात्र हा कालबाह्य झालेला प्रकार पुन्हा शाळांमध्ये यावा तसेच विद्यार्थ्यांना सदृढ शरीराचे महत्व कळावे यासाठी वाबळेवाडी शाळेने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे क्रिडाशिक्षक पोपट दरंदले यांनी सांगितले. प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर ,पुणे