पुणे :-
शिवसेना उपतालुका संघटिकापदी ( निमगाव म्हाळूंगी पंचायत समिती गण ) निमगाव म्हाळूंगी येथील सौ.अश्विनी एकनाथ लांडगे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
शिवसेना उपनेते ,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सौ.अश्विनी लांडगे यांना याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे.
नियुक्तीपत्रात असे म्हटले आहे,
हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्यनेते, मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना सचिव श्री संजयजी मोरे ,शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, शिरूर तालुकाप्रमुख पै.रामभाऊ सासवडे, यांच्याशी विचारविनिमय करून आपली शिवसेना उपतालुका संघटिकापदी ( कार्यक्षेत्र निमगाव म्हाळूंगी पंचायत समिती गण ) नियुक्ती करण्यात आली आहे.
आपण यापुढील काळात शिवसेना प्रमुखांचा आदेश अंतिम मानून शिवसेना पक्षाच्या ध्येयधोरणांवर निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे, कसोटीने पक्षबांधणी करून सामाजिक कार्य करावे असे नियुक्तीपत्रात म्हटले आहे.
एन टी व्ही न्यूज मराठीसाठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे
शिरूर ( पुणे )
8975598628