औरंगाबाद : सोयगांव येथील समाजसेवक योगेेश बोखारे यांना सु-लक्ष्मी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रूग्णसेवा समुह,शासकीय रुग्णालय घाटी,औरंगाबाद यांच्या तर्फे त्यांनी केलेल्या सामाजिक कार्या बद्दल त्यांना सेवागौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.समाजसेवक योगेश दिनकर बोखारे हे मागील दहा वर्षा पासून आपल्या वाढदिवसा निमित्त आपले कर्तव्य म्हणून या उदात्त भावनेने दि.१ ऑक्टोंबर या दिवशी परीसरातील गोर गरीबांच्या मुलांना तसेच प्रा.शा.रामजीनगर येथील विद्यार्थ्याना लेखन साहीत्य,पुस्तके,वह्यांचे वाटप करत असतात.तसेेच सोयगांंव शहरातील जागृत देवस्थान भैरवनाथ मंदीर येथे वड वृक्षाचे वृक्षारोपण तसेच परीसरातील शाळांमध्ये वेगवेगळे प्रकारचे वृक्षारोपण त्यांंनी केलेले आहे.त्यांंना या अगोदरही त्यांच्या कार्या बद्दल सोयगांव तालुका पेन्शन संघटना यांनी प्रमाणपत्र देऊन त्यांंना गौरविण्यात आले आहे.ते सोयगांव शहरातील नावारुपास आलेल्या कै.बाबुरावजी काळे पतसंस्थेत संचालक म्हणून कार्यरत आहेत तसेच योगेश बोखारे हे दि.९/५/२००१ पासून ते आज पर्यंत होमगार्ड संघटने मध्ये काम करित आहे.त्यांनी कोरोना काळात चांगल्या प्रकारे ड्युटी केली म्हणून ही त्यांना विविध संघटने कडून प्रमाणपत्र मिळाले आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेऊन या वर्षाचा सेवा गौरव-२०२२-२०२३ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह घाटि औरंगाबाद मार्फत दिला जाणार आहे. औरंगाबाद येथे मोठ्या थाटात सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि. ३०/१२/२०२२ रोजी वेळ २:००वाजता शुक्रवारी मौलाना आझाद रिसर्च सेंटर टि.व्हि. सेटर औरंगाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.असे निवड समिती तर्फे पत्राद्वारे समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे.सेवागौरव पुरस्कार जाहीर झाल्याने समाजसेवक तथा होमगार्ड योगेश दिनकर बोखारे-पाटील यांचे सर्व मिञ परीवारा कडून कौतुक होत आहे. आणि अभिनंदन चा मोठा वर्षाव होत आहे अशी माहिती योगेश बोखारे यांनी दिली
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद