मुल- मुल तालुक्यातील हळदी येथील भाजपचे अधिकृत ग्राम पंचायत सदस्य आणि सक्रिय कार्यकर्त्यांचा भारतीय राष्ट्रीय कांग्रेसमध्ये कांग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या कर्तृत्वावर व कार्यावर विश्वास ठेवून तालुका कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात कांग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्ष प्रवेश केला. यामध्ये हळदी ग्राम पंचायत सदस्य शरद भुरसे, शरद आत्राम व भाजपचे सक्रिय कार्यकर्ते सुधीर लेनगुरे, रवींद्र चलाख,जितेंद्र कोठारे यांनी कांग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे कांग्रेसनेते संतोषसिंह रावत यांनी कांग्रेस पक्षाचा पंजा दुपट्टा व पंजा टोपी घालून पाचही कार्यकर्त्यांना पक्षात घेऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी हळदी येथील कांग्रेसचे जेष्ठ नेते तथा आदर्श खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे यांनी कांग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले असून आपल्या गावातील व परिसरातील कुठल्याही समस्या कांग्रेसनेते संतोष भाऊ सोडवतील भाऊ आपल्या पाठीशी असल्याचे मनोगत व्यक्त केले. सुरवातीस तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर यांनी कमेटी तर्फे हळदी वासीयांचे स्वागत केले. यावेळी कांग्रेस पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संदीप कारमवार, भेजगावचे सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अखिल गांगरेड्डीवार, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन बाजार समिती संचालक राजेंद्र कन्नमवार, हळदी येथील कांग्रेस कार्यकर्ते दीपक लेनगुरे, अनिल मडावी, महेश चीचघरे, तगदिर कोठारे यांचेसह तालुका व शहर कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.