पुणे : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील आर एम डी विद्यानिकेतन प्रशाला व ज्युनिअर कॉलेज च्या वतीने गणित -विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये गणित व विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा, आत्मविश्वास निर्माण व्हावा, विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळावा या हेतूने प्रेरित होऊन गणित – विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते असे विद्यालयाचे प्रिन्सिपॉल संजयकुमार गजऋषी यांनी सांगितले. प्रदर्शनात २५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होवून ७५ प्रयोगांचे सादरीकरण केले.प्रदर्शनाचे उद् घाटन कोंढापुरी गावचे सरपंच संदीप डोमाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री तुकाराम बेनके व सचिव श्री. मारुती कदम सर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे कौतुक करत ते म्हणाले, ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्या वेळेस संधीचे सोने करावे .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सिंहगड कॅम्पस डायरेक्टर सौ. अनिता माने मॅडम यांनी भूषविले. प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य श्री. संजयकुमार गजऋषी यांनी केले. या प्रसंगी विज्ञान शिक्षक श्री. आकाश गायसमुद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री.धनंजयराव गायकवाड , माजी सरपंच श्री. स्वप्नील भैय्या गायकवाड, उपसरपंच श्री. सुनीलतात्या गायकवाड, श्री महेंद्र घाडगे ,स्प्रिंग डेल स्कुल च्या प्राचार्या सौ.गावडे मॅडम, कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रम व प्रदर्शन यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी प्रशाला व जुनिअर कॉलेजचे विद्यार्थी ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. श्रीमती नलावडे मॅडम यांनी सुत्रसंचलन केले श्री. मनोज कोल्हे यांनी आभार मानले.
