पुणे :-
श्री .स्वामी समर्थ सेवा संस्था शिरुर यांच्या वतीने प्रितमप्रकाशनगर येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मंदीर उभारण्यात आले असुन या ठीकाणी श्री . स्वामी समर्थ यांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा बुधवार दिनांक २५ जानेवारी व गुरुवार दि. २६ जानेवारी २०२३ रोजी पार पडणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष योगेश वाळकीकर व खजिनदार गणेश घाटगे यांनी दिली .
बुधवार दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी गणपती पुजन, मातृका पुजन, वास्तुपीठ पुजन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत . तर ग्रामप्रदक्षिणा , मिरवणुक व धान्यादी वास मिरवणुक दुपारी ४ वाजता सुरजनगर येथुन निघणार असुन शहरातील प्रमुख भागातुन ही मिरवणुक जाणार आहे .विविध वाद्यपथकाच्या या मिरवणुकीत सहभाग असणार आहे .
गुरुवार दि.२६ जानेवारी रोजी कलशारोहन व मुर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त स्वामी समर्थ मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात येत असुन सकाळी ८ वाजता होमहवन होणार आहे . यावेळी देवदैठण येथील किर्तनकार आचार्य परमेश्वर महाराज दंडवते यांचे किर्तन होणार आहे .दुपारी १ वाजता कलशारोहन , मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा व महाआरती होणार आहे . सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन दोन दिवस होत असलेल्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री . स्वामी समर्थ सेवा संस्था पदाधिका-यांनी केले आहे .
शहरातील प्रितम प्रकाश नगर येथे स्वामीचे भव्य असे मंदिर उभे करण्यात आले असुन मंदिराच्या गाभा-या समोर सभा मंडप बांधण्यात आला आहे मंदिरातील स्वामी समर्थ यांची मुर्ती राजस्थान मधील उदयपुर येथुन आणण्यात आली आहे . विविध झाडे व फुलझाडे लावुन परिसर हिरवेगार करण्यात येत आहे .भविष्यात अधिकाधिक सेवा सुविधा भाविकांना देणार असल्याचे योगेश वाळकीकर व गणेश घाडगे यांनी सांगितले .
श्री. स्वामी समर्थ सेवा संस्थेचे अध्यक्ष योगेश वाळकीकर ,उपाध्यक्ष ॲड . नारायण पवार , सचिव दीपक वर्मा , खजिनदार गणेश घाटगे , विश्वस्त चंद्रकांत निघोजकर , प्रभावती पवार , मंगला बागमार ,संपत लोखंडे , विष्णु वेताळ , भुषण कडेकर आदींसह अनेक स्वामीभक्तांच्या पुढाकारातुन व योगदानातुन शिरुर शहरात स्वामी समर्थ यांचे मंदिर उभारणीचे स्वप्न साकार होत असल्याचे अध्यक्ष वाळकीकर यांनी सांगितले .
एन टी व्ही न्यूज मराठीसाठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे 8975598628

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *