पुणे :-
नाकाबंदीमध्ये वाहनांची तपासणी करत असताना ट्रॅफिक पोलीसांना कारमध्ये पितळी मुठ असलेली लोखंडी तलवार सापडल्याने शिरूर ट्रॅफिक पोलीसांनी एकास अटक केली.
अक्षय संजय जगदाळे वय – २८ वर्षे, व्यवसाय फायनान्स वसूली एजंट रा.पारनेर ता.पारनेर जि.अहमदनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलीस शिपाई शेखर शिवाजी झाडबुके यांनी याबाबत फिर्याद दिली.
प्रभारी अधिकारी सुरेशकुमार राऊत, शिरूर वाहतूक पोलीस पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार १ हजार रूपये किंमतीची एक पितळी मूठ असलेली तलवार ,लांबी ६४ सेंटिमीटर, लोखंडी पाते, १६.५ सेंटिमीटर लांबीची गोलाकार पितळी मूठ, २.५ सेंटिमीटर रूंदीचे लोखंडी पाते , एका बाजूला धारदार टोकाला निमुळते तसेच ३ लाख रूपये किंमतीची सिल्व्हर रंगाची पोली कार नंबर एम एच १४ डी एक्स ७६७८ शिरूर गावच्या हद्दीत पाबळफाटा येथे १५ जानेवारी २०२३ रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाबळफाटा चौकात नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करत असताना कार चालक अक्षय संजय जगदाळे वय २८ वर्षे,रा.पारनेर जि.अहमदनगर याने त्याच्या ताब्यातील कार नंबर एम एच १४ डी एक्स ७६७८ च्या डिकिमध्ये बेकायदेशीररित्या तलवार बाळगलेली असताना मिळून आल्याने त्याच्याविरूद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४ ( २५ ) प्रमाणे फिर्याद दाखल केली.
पोलीस नाईक शिंदे पुढील तपास करत आहेत.
एन टी व्ही न्यूज मराठीसाठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे 8975598628

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *