पुणे :-
अठरा वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या चिंचोली मोराची ता.शिरूर येथील माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. बत्तीशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची येथील जय मल्हार माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे !
चिंचोली मोराची येथील जय मल्हार माध्यमिक विद्यालयाच्या सन २००४ साली शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच
आनंद कृषी पर्यटन चिंचोली मोराची येथे पार पडले. या स्नेहसंमेलनात ३५ विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या अशी माहिती माजी विद्यार्थी पोपट उकिरडे यांनी दिली.
यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गंमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाकाची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांशी उपस्थित शिक्षकांनी संवाद साधला.शिक्षक श्री पुंडे गुरुजी. श्री.ज्ञानेश्वर बाठे सर. श्री.सी.डी. धुमाळ सर, सौ.संगीता शिंदे मॅडम यांचा सत्कार सर्व विद्यार्थ्यांनी केला. श्री.मुकेश माकर आणि सौ.निशा नाणेकर/पुंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन केले विद्यमान चेअरमन सुभाष निवृत्ती नाणेकर यांनी आभार मानले.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे
शिरूर जि.पुणे
8975598628
