पुणे :-
शिरूर तालुक्यातील उरळगाव गावच्या हद्दीत चोरमले वस्तीजवळ असलेल्या पाझर ओढ्याच्या पुलाच्या कठड्याजवळ अनोळखी महिलेचा गळा दाबून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देवून खून करण्याची घटना घडली.
पोलीस उपनिरीक्षक विक्रम शिवलाल जाधव यांनी या घटनेबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी महिलेचे वर्णन याप्रमाणे :-
वय ४० ते ५० वर्षे, उंची अंदाजे ५ फूट, बांधा मध्यम, डाव्या हातास आतील बाजूस एक फुलाची गोल नक्षीचे गोंदलेले नेसणीस चॉकलेटी रंगाची साडी त्यावर पांढरे फुलाची डिझाईन व चॉकलेटी रंगाचा ब्लाऊज ,डाव्या हाताच्या करंगळीच्या शेजारील बोटात पिवळ्या धातुची पिळ्याची अंगठी, हातात पिवळ्या धातुच्या दोन बांगड्या, लाल रंगाच्या काचेच्या दोन बांगड्या .
उरळगाव गावच्या हद्दीत ढमढेरे वस्तीवरून आरणगावला जाताना चोरमले वस्तीजवळ असलेल्या पाझर ओढ्याच्या पुलाचे कठड्याजवळ कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून अनोळखी महिला वय ४० ते ५० वर्षे हिचा गळा दाबून तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तसेच ओळख पटू नये म्हणून मयताच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले आहे वगैरे फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे असे शिरूर पोलीसांनी सांगितले.
सदर गुन्ह्यातील अनोळखी, अज्ञात महिलेचा व अज्ञात आरोपीचा आपले पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेवून काही माहिती मिळाल्यास तात्काळ शिरूर पोलीस स्टेशनशी ०२१३८- २२२१३९, सुरेशकुमार राऊत पोलीस निरीक्षक – ९८२३१०८४५२, नितीन सुद्रीक पोलीस हवालदार – ९५५२५३७४५५ यांच्याशी संपर्क्र करण्याचे आवाहन शिरूर पोलीसांनी केले असून माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाईल व योग्य ते बक्षिस दिले जाईल असे शिरूर पोलीसांनी सांगितले.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे
शिरूर जि.पुणे
8975598628
