कोल्हापूर
पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण त्यांचे मुळगाव हे मानेकाॕलनी पोस्ट भोळी तालुका खंडाळा जिल्हा सातारा असुन ते सद्या कोल्हापूर गट क्रमांक 16 येथे कार्यरत आहेत त्यांनी स्वतः लिहीलेला काव्यसंग्रह सध्या खुपच प्रसिद्ध होऊन रसिक मित्रांच्या पसंतीस उतरत आहे त्यांना तो अगदी मनापासून आवडत आहे सोशल मिडीया वरती देखील या काव्यसंग्रहाला व त्यातील सुरेख अशा कवितांना भरपुर प्रतिसाद मिळत आहे
या काव्यसंग्रहात सर्वच विषय कवीने अत्यंत सहजतने मांडले आहेत त्यामध्ये शहीद जवानांवरील कविता, प्रेम कविता, विरह कविता, नातेसंबंध
अशा विविध विषयावरील कविता त्यांनी लिहल्या आहेत
सध्या पोलीस भरतीवरील संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असललेली
पोलीस होण्याच स्वप्न तू उतरव आता सत्यात हे गीत देखील त्यांनीच लिहले आहे
काव्यसंग्रहाचे नाव
खाकी वर्दीतील दर्दी कवी ————————–
त्यांनी लिहलेली सुरेख अशी कविता
पोलिस पत्नी
विसरता कसा येईल पोलीस पत्नीचा त्याग ..ती देखील आहे या वर्दीचाच एक भाग.. तो तरी कुठे असतो म्हणा कुठल्या सणासुदीला घरी .! तिच्या संयमाचीच ती सत्य परिक्षा असते खरी ! तीही खूप जिद्दी असते कधीच माणत नाही हार ! कुटूंबाची जबाबदारी ती अगदी धैर्याने पाडते पार ! करावं तेवढ कमीच आहे तिच्या संघर्षाचं कौतुक ! तिच्या नशिबी नसतंच शक्यतो आपल्या पोलीस पतीचं सुख.! बंदोबस्तात त्याचा चेहरा तिच्यामुळेच तर असतो हसरा.! तो घरी येईल तोच दिवस तिच्यासाठी दिवाळी दसरा…
कवी पोलीस उपनिरीक्षक अजय चव्हाण मौजे मानेकाॕलनी ता.खंडाळा जि. सातारा
प्रतिनिधी जब्बार तडवी कोल्हापूर