कोल्हापूर : तानाजी बबन धरणे ग्रामविकास अधीकारी पंचायत समिती रोहा जिल्हा रायगड यांची हेलपाटा कादंबरी सध्या सोशल मिडीया वरती खुप गाजत आहे ही हेलपाटा कादंबरी प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला
सरकार स्वाभिमानी वाचनालय आणि कुमार कन्या मंदिर इंगळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापुर येथे आयोजित “१३ व्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य ” संमेलनात लेखक तानाजी धरणे लिखित व पी आर ग्रुप आॕफ पब्लिकेशन वरुड अमरावती प्रकाशित संघर्षमय व हृदयस्पर्शी ” हेलपाटा ” हि कादंबरी मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली . या प्रसंगी संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक डाॅ. श्रीकांत पाटील घुणकी ,स्वागताध्यक्ष जब्बुकुमार देसाई, सरपंच मोरे व ग्रामपंचायत सदस्य तसेच उद्घाटक साहित्यिक डाॅ. सुरेश कुर्हाडे , गडहिंग्लजचे विचारवंत प्रमुख अतिथी प्रा. किसनराव कुर्हाडे (सितायनकार ) कवी भाऊसाहेब कांबळे, जेष्ठ कवी मधुकर हुजरे व इतर कवी, कवियित्री, पत्रकारबंधु उपस्थित होते .पुस्तक प्रकाशनानंतर मान्यवरांना विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल अनेक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले .
या प्रसंगी कवी सरकार इंगळी यांना मान्यवरांचे हस्ते फोर व्हिलर गाडी भेट देण्यात आली . दुपारच्या सत्रात भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर कवी संमेलनाध्यक्ष तानाजी धरणे यांचे अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले .यात अनेक प्रतिभावंत कवी कवियित्री यांनी आप आपल्या बहारदार रचना सादर करुन उपस्थितांची मने जिंकली . या संमेलनात तिन्ही सत्रात प्रख्यात कवी व निवेदक प्रा .इद्रजित पाटील यांनी बहारदार सुत्रसंचालन केले . या प्रसंगी कवी सरकार यांनी प्रस्तावीक केले .अनेक विचारवंतांनी आपली मौलिक मते मांडली .शेवटी संमेलनाध्यक्ष डाॅ. श्रीकांत पाटील यांनी आपले विचार मांडुन सर्वांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता? करण्यात आली .
NTV न्युज मराठी प्रतिनिधी जब्बार तडवी कोल्हापूर