रयत शिक्षण संस्थेचे, रा. बा. पाटील विद्यालय सडोली खालसा व भागशाळा हळदी येथे थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी स्कुल कमिटी सदस्य,बाळासो साळोखे, एम. डी. निचेते, उदयसिंह पवार -पाटील, विक्रमसिंह पवार-पाटील, एस. एस. पाटील, सरपंच, अमित पाटील यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक, एस. बी. कुरणे यांनी मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी झाँज पथक, लेझीम पथक या पारंपरिक वाद्याच्या गजरात गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठीक ठिकाणी महिलांनी कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी रयतचे आजी -माजी विद्यार्थी , शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी,, ग्रामस्थ व विविध सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
Kolhapur