* केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाला गती.
* महापालिकेने नाट्यगृह परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली.
* कारवाईदरम्यान नागरिकांनी सहकार्य दाखवले.
* पुनर्बांधणीसाठी परिसर मोकळा करण्याचा पहिला टप्पा पूर्ण.
कोल्हापूरमधील (KOLHAPUR) संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाला आता गती मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेने नाट्यगृह परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली आहे.
या परिसरातील काही नागरिकांनी जागेवर अतिक्रमण केले होते. मात्र, कारवाईदरम्यान नागरिकांनी सहकार्य दाखवले. काहींनी आपले साहित्य नेण्यासाठी थोडी मुदत देण्याची मागणी केली होती.
एनटीव्ही न्यूज मराठी, कोल्हापूर
