आरोपी निघाले दोन सख्खे भाऊ. एक पोलिसांच्या ताब्यात तर दुसरा फरार
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील अभिलेखावरील सराईत एका गुन्हेगाराला जिवंत तीन काडतुस व दोन मिस पायर झालेले बुलेट हेड सह एक देशी कट्टा घेऊन जाताना मलकापूर शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली डीपी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक ईश्वर सोळंके यांच्या नेतृत्वात ही सदरची कारवाही करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांना गोपनीय माहिती मिळाली की मलकापूर कडून गनवाडी कडे दोन इसम लाल रंगाची स्कुटी घेऊन त्यात एक देशी कट्टा घेऊन जात आहे या सदर माहितीवरून मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक ईश्वर सोळंके ईश्वर वाघ सलीम बर्डे संतोष कुमावत प्रमोद राठोड
यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांनी तीन साक्षीदारांसह शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुद्वारा नजिक सापळा रचला असता
दोन इसम त्यांचे ताब्यातील लाल रंगांचे स्कुटी वर डबलसीट मलकापुर कडून गणवाडी गांवाकडे जातांना दिसले . त्यास हात देवून थांबवले असता तो पो.स्टे . अभिलेखावरील सराईत गुन्हेगार नामे शेख साबीर शेख अहेमद वय -28 वर्ष रा . सायकल पुरा मलकापुर जि.बुलढाणा त्यांचे मागे बसलेला एक इसम स्कुटी थांबताच स्कुटीवरुन उडी घेवून पळु लागला त्यास पोकों.आसिफ शेख व पोकों प्रमोद राठोड यांनी पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला असता तो झाडाझुडुपांचा फायदा घेत पळून गेला . त्यानंतर शेख साबीर यास तो कोठे जात आहे व पळून गेलेला इसम कोण आहे याबाबत विचारले असता त्याने मी गणवाडी कडे जात आहे व तो पळून गेलेला इसम माझा भाऊ नामे शेख तालिब शेख अहमद अंदाजे वय 25 वर्ष रा . सायकलपुरा मलकापुर जि.बुलढाणा हा असल्याचे सांगीतले. त्याची अंगझडती त्याचे वाहन क्रमांक
एम.एच 03 ए यु . 7372 मो.सा.चे झडती घेतली असता तिचे डिक्कीमध्ये एक काळया रंगांची पिस्टल ग्रीप असलेली गावठी बनावटीची स्टील बॉडी असलेली पिस्टल व तीन जिवंत काडतुस सह दोन मिस फायर बुलेट हेड मिळुन आले. त्यावरून आरोपी शेख साबीर शेख अहेमद वय -28 वर्ष रा . सायकल पुरा 2. शेख तालिब शेख अहेमद अंदाजे वय -25 वर्ष रा . सायकल पुरा मलकापुर यांचेवर कलम 3,25 आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एक आरोपी फरार आहे पुढील तपास मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहे.