सिडको कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

औरंगाबाद : सिडको वाळूज महानगरातील जुनाट ड्रेनेजलाइन बदलण्यात यावी व मूलभूत सुविधांसाठी सिडको कार्यालयासमोर २१ फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचा इशारा त्रस्त नागरिकांतर्फे देण्यात आला आहे.
सिडको वाळूज महानगर- एकमधील एलआयजी व एमआयजी गृहनिर्माण योजनेतील घरासाठी सिडको प्रशासनातर्फे तीन दशकांपूर्वी ड्रेनेजलाइन टाकण्यात आली होती. आजघडीला ही ड्रेनेजलाइन जुनाट झाली असून ठिकठिकाणी चोकप होत असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कामगार वसाहतीतील ड्रेनेजचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, यासाठी शिवसेनेचे विभागप्रमुख दत्तात्रय वर्पे यांनी आठ महिन्यांपूर्वी सिडको कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, आश्वासन देऊनही ड्रेनेजलाइनचे काम सुरू न करण्यात आल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले आहे. येथील जुनाट ड्रेनेजलाइन बदलून नवीन ड्रेनेजलाइन टाकून एसटीपी प्रकल्प उभारण्यात यावा, नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती करावी, या परिसरातील आरोग्य केंद्र, पोलिस चौकी, समाजमंदिर, अंगणवाडी, भाजी मंडई, बस थांबे इ.ची दुरुस्ती, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी एक खिडकी पद्धत सुरू करण्यात यावी, आदी प्रश्नाकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. नागरी समस्या सोडविण्यात याव्यात, तत्काळ अन्यथा सिडकोच्या वाळूज कार्यालयासमोर २१ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण स करण्याचा इशारा शिवसेनेचे स विभागप्रमुख दत्तात्रय वर्षे, नामदेव सागडे, त्र्यंबक जगताप, जनार्धन प खिल्लारे, प्रभाकर शेळके व त्रस्त नागरिकांनी दिला आहे. या संदर्भात सिडकोचे प्रशासक सोहम वायाळ यांना निवेदनही देण्यात आले आहे.

प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
Ntv न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद.
मो.8484818400

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *