जखमीचे नाव सुनील अगारीया (रा. पथलगाव जी. जसपुर, छत्तिसगड)
नागपुर खाजगी रुग्णालयात दाखल
नागपुर : आदासा कोळसाखाणीत ट्रकच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाल्यामुळे कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाला. ही घटना २५ फेब्रुवारीला पहाटेच्या ४.३० वाजता घडली.
• सुनील अगारिया (रा. पथलगाव, जि. जसपूर, छत्तीसगढ) असे जखमी कामगाराचे नाव आहे. तो सहा महिन्यांपासून वेकोलि कोळसाखाणीमध्ये बॅटरी चार्जिंग पॉइंटला कार्यरत होता. येथून कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रक व टिप्परच्या बॅटरी चार्जिंग करीत असताना बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे सुनील अगरिया जखमी झाला. शासकीय रुग्णालय सावनेर येथे त्याच्यावर प्रथमोचार केल्यानंतर त्याला नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कामगाराची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
मंगेश उराडे नागपुर