लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रारदार यांनी समक्ष येवून तक्रार नोंद केली की, तक्रारदार यांची मौजा-गौळ शिवारातील वडीलोपार्जीत शेत सर्वे क्र.८० मधील ४.०५ हे. आर. शेती असुन नमुद शेती मध्ये त्यांना कॅनलवरून ओलीताकरिता पाण्याची आवश्यकता असल्याने त्यांनी सदर ठिकाणी विद्युत मिटर बसविण्याकरिता मागील वर्षी ऑनलाईन अर्ज केला होता. त्या बाबतचे कागदपत्रे त्यांनी ३३ के.व्ही एम.एस.ई.बी. विज वितरण कंपनी कार्यालय अडेगाव येथे दाखल केले होते. तक्रारदार यांनी दि. २५/०२/२०२३ रोजी १०,९०३/- रूपयांचा कायदेशिर डिमांड भरणा केली होती. त्यानंतर ३३ के. व्ही एम. एस. ई. बी. विज वितरण कंपनी कार्यालय अडेगाव येथील नियुक्त कनिष्ठ अभियंता श्री वासुदेव नागोराव पारसे वय ५७ वर्ष पद कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, ३३ के. व्ही. विज वितरण केन्द्र गिरोली (आडेगाव ). ता. देवळी जि. वर्धा वर्ग (३) राहणार शिवाजी सभागृह प्लॉट नं. ६२३. विनायक अपार्टमेंट दत्तात्रेय नगर, नागपूर यांनी तक्रारदार यांना तुझे शेतात लवकर विज मिटर लावुन पाहीजे असेल तर १०००/- रूपये मला दयावे लागतील असे सांगुन अप्रामाणीक पणे स्वतःचे आर्थिक लाभा करिता १०००/- रूपयांची लाच मागणी केली. तक्रारदाराचे तक्रारीचे अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सापळा कारवाईचे आयोजन करण्यात येवून तक्रारदाराकडून रु. १०००/- लाच रक्कम स्विकारतांना कनिष्ठ अभियंता श्री वासुदेव नागोराव पारसे यांना रंगेहात पकडण्यात आले.
नमुद आलोसे यांनी आपले लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता लाच रकमेची मागणी करून स्विकारल्याने त्यांचे विरुद्ध पो.स्टे. देवळी जि. वर्धा येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
विनोद गोडबोले प्रतिनिधी नागपूर