चिचोली व भानेगाव ग्रामपंचायत अंतर्गत जवळपास १४३ घरकुल ग्रामीण व शहरी आवास योजने अंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत. मात्र घरकुल बांधकाम करण्यासाठी वाळू उपलब्ध नाही त्यामूळे महागाईच्या काळात घरकुल कसे बांधायचे असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे जिल्हाधिकारी कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या वाळू साठ्यातून ५ ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहे मात्र कागदोपत्री कार्यवाही अजूनही पूर्ण करण्यात आली नाही त्यामूळे लाभार्थ्यांना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामूळे घरकुल लाभार्थ्यांना त्वरित वाळू उपलब्ध करून देण्यात यावी या आशयाचे निवेदन नायब तहसीलदार संजय अनवाणे सावनेर यांना बहुजन वंचित आघाडीच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा सचिव अजय सहारे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

मंजूर घरकुल लाभार्थी पैकी ग्रामीण आवास योजने अंतर्गत लाभार्थी यांना तलाठी कार्यालयात जप्त असलेल्या वाळू साठ्यातून वाळू देण्यात देण्यात येणार आहे मात्र पंतप्रधान शहरी आवास योजने अंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना वाळू देण्यात येणार नाही अशी चर्चा आहे.

संपूर्ण नागपूर जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव करण्यात आले नाहीत महसूल विभाग व पोलिसांच्या नाकावर टिच्चून बिनधास्त अवैध वाळू उत्खनन सुरू आहे त्यामूळे वाळूच्या किमती गगनाला भिडल्या आहेत अश्या परिस्थितीत घराचे बांधकाम करायचे कसे करायचे असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांना पडला आहे.

ग्रामीण व शहरी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना शून्य रॉयल्टी वर वाळू उपलब्ध करून देने तहसील कार्यालयाकडून अपेक्षित आहे मात्र ते सुद्धा मुंग गिळून बसले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तहसील कार्यालया मार्फत घरकुल लाभार्थ्यांना त्वरित वाळू उपलब्ध करून देण्यात यावी अन्यथा सर्व घरकुल लाभार्थी आपल्या हक्कासाठी आंदोलन करतील अशा इशारा वंचित बहुजन आघाडीने निवेदनातून दिला आहे.
याप्रसंगी वैभव येवले, पप्पी वाडीभस्मे,अनिल नांदुरकर आदि उपस्थित होते.
प्रतिनिधी विनोद गोडबोले खापरखेडा नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *